*धामणगाव शहरात सहा वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार – आरोपी अटकेत दत्तापूर भागातील घटना*

0
1579
Google search engine
Google search engine

धामणगाव रेल्वे,ता. महाविद्यालयात शिकत असलेल्या कुमारी प्रणीता हिच्या निर्घृण व क्रूर हत्येला अवघे २४ तासही उलटले नसतांना शहरातील दत्तापूर भागातील एका सहा वर्षीय चिमुकलीवर एकाने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना मंगळवारला (ता.७)उघडकीस आली आहे.दरम्यान पोलिसांनी आरोपी अटक केली असून विविध कलमान्वये दत्तापुर पोलीस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार संत रविदास नगर येथे आपल्या सहा वर्षीय मुली सोबत महिला तीन वर्षापासून माहेरी राहते. मंगळवारला (ता.७) सकाळी आपली मुलीला आंघोळीला नेत असताना मुलीच्या अंतर्वस्त्राला रक्ताचे डाग आढळून आले.

आरोपी

त्यामुळे मुलीची विचारपूस केली असता सोमवार (ता.६) कालचा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मुलीने आईला सांगितल्या नुसार सोमवारला (ता.६) दुपारी दुपारच्या दरम्यान आरोपी नागेश नंदलाल कुरील (२१) याने मुलीला मोबाईल दाखवतो असे सांगून घरी बोलावले व तिच्याशी कुकर्म करण्याचा प्रयत्न केला.मंगळवारला (ता.७) सकाळी उघडकीस आलेल्या या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ माजली असून स्थानिक लोकांचा जमाव पोलीस स्टेशनवर गोळा झाला होता.दत्तापूर पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखत लगेच आरोपीला शिताफीने अटक केली.आरोपी विरुद्ध बाललैंगिक अत्याचार, भा.द.वि. ३७६,३७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला बुधवारला (ता.८) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.याप्रकरणी अधिक तपास दत्तापूर पोलीस करत असून सदरच्या प्रकरणाने धामणगाव शहरातील समाजमन सुन्न झाले आहे.