*नायलॉन मांज्या आणि वरली मटका वर चांदुर बाजार पोलिसांची कार्यवाही* *6 आरोपी याना घटनास्थळवरून अटक*

0
827
Google search engine
Google search engine

चांदुर बाजार :-

मकर संक्रांत जवळ आली असून या दिवसामध्ये पतंग उडविली जाते मात्र त्यासाठी बंदी असताना देखील चांदुर बाजार बाजारपेठ मध्ये नायलॉन मांज्या विकला जात असल्याच्या उपविभागीय अधिकारी पोपट अबदगिरे यांच्या आदेशानुसार चांदुर बाजार पोलिसांनी स्थानिक प्रतिष्ठान रेड केली यामध्ये त्यांनी 4 आरोपी याना ताब्यात घेतले.

गुलजार पेठ येथील रहिवासी मो.मुजफिल मो.शरीफ वय 49 वर्ष यांच्या घरून १७७९० रुपयांचा,काझीपुरा येथील रहिवासी मो.सैफउद्दिन रतनवाला यांच्या घरून ८९७० रुपयेचा,आठवडी बाजार मधील बालक जरनल स्टोअर्स मधून रुपये 1320 चा आणि आरोपी शकील अहमद अब्दुल हाफिज वय 45 वर्ष,आणि त्यानंतर भट पुरा येथील फैजल हुसेन जनरल स्टोअर्स छापा टाकला असता ताहीर अली कमरुद्दीन वय 44 वर्ष यांच्या कडून 270 रुपयांचा नायलॉन मांज्या जप्त करून त्यांच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

तर चांदुर बाजार मधील काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात वरली मटका सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना होती.त्या आधारे त्यांनी सापळा रचून यंगस्तर चौकात शनी मंदिर च्या बाहेरील ओट्यवर छापा टाकला असता यामध्ये आरोपी शेखर नंदकिशोर जोशी,वय ३६वर्ष व आरोपी आशीष नंदकिशोर जोशी वय ४० वर्ष यांच्या कडून वरली मटक्यासाठी लागणारे साहित्य आणि मोबाईल तसेच 3405 रुपयांचा मुद्देमाल जप्त करणयात आला.या कार्यवाही साठी पोलिसांनी खाजगी वाहनाचा उपयोग केला.

या दोन्ही कार्यवाही अचलपूर येथील उपविभागीय अधिकारी पोपट अबदगिरे यांच्या आदेशानुसार ठाणेदार उडायसिग साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पंकज दाभाडे,सहायक पोलीस निरीक्षक (महिला)तेजस्विनी गीरसावडे,पोलीस स्टेशन खुफिया प्रशांत भटकर,पंकज फाटे,भूषण पेटे, वीरेंद्र अमृतकर यांनी केली.