पप्पा मला खेळणे नकोत खेळ हवा ‘खेळण्यातील गेम’ ने प्रेक्षक अंतर्मुख, राज्य बालनाट्य स्पर्धा

0
1425
Google search engine
Google search engine
अमरावती :-
अरे बेटा तुला इतके खेळने दिलेत न घेऊन मग बाहेर खेळायला जाण्याची काय गरज, वाटल्यास तुला आणखी नवा गेम घेऊन देतो, अहो पप्पा मला खेळणे नकोत मला खेळ हवा आहे, तो खेळण्यासाठी तुमचा वेळ हवा आहे. हा संवाद आहे काल झालेल्या खेळण्यातील गेम या बालनाट्यातील, या संवादाने नाट्यगृहातील प्रेक्षक काहीवेळा पर्यंत अंतर्मुख झाल्याचे पाहायला मिळाले.
विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था अमरावती येथील संगीतराव भोसले नाट्य सभागृहात सतराव्या राज्यबालनाट्य स्पर्धेत काल चांदूर रेल्वे येथील पिपल्स कला मंच द्वारा निर्मित व विवेक राऊत लिखित खेळण्यातील गेम हे बालनाट्य सादर झाले. टिक्कर बिल्ला, पतंग, कब्बडी, लगोरी, भवरा, सु काडी असे जुने परंपरागत खेळ विसरून नव्या मोबाईल गेम मध्ये ठरविलेल्या आजच्या बालकांना जुन्या खेळांची माहिती देत त्यांच्या पालकांना ही या खेळांची आठवण हे बालनाट्य करून देते. सोबतच मुलांना खेळणे घेऊन दिल्या पेक्षा त्यांना खेळात सोबत हवी असते यासह मोबाईल गेम चे दुष्परिणाम या बालनात्यातून लेखकाने उतरविले आहे व त्याचे तेवढेच सुंदर सादरीकरण दिग्दर्शक मनीष हटवार यांनी केले. या बालनाट्याला इतर तांत्रिक साहाय्य मंगेश उल्हे, सिद्धार्थ भोजने, विजय दवाळे, प्रीती भुरे, दीपाली हटवार, प्रेरणा वानखडे, दीक्षा खांडेकर, शुभम खांडेकर, अक्षय मडावी, आणि बाल कलाकारांमध्ये विहान राऊत, शाश्वत उल्हे, स्वरूप उल्हे, अलोक दवाळे, स्वराली जिकार, तनवी दवाळे, सौरवी बुरे,अक्षता भोंडे, धनश्री हाडके, अक्षरा आत्राम, यश इंगळे आदींनी सहभाग नोंदविला.
 बालनाट्यात ही काळाची गरज
आज पर्यंत बालनाट्य हे शाळांमध्ये होतांना माहीत होते, परंतु यावर्षी मुलीच्या सहभागामुळे बालनाट्य पाहण्याचा आणि जगण्याचा योग आला आणि बालनाट्य चळवळ आजच्या काळात किती गरजेचे आहे हे लक्षात आले. खेळण्यातील गेम हे खूपच सुंदर बालनाटक आज पाहता आले याचा आनंद झाला असल्याचे मत पालक आणि प्रेक्षक म्हणून प्रीती भुरे यांनी व्यक्त केले.