जेएनयु विद्यार्थी नेता उमर खालीद उद्या अमरावती जिल्ह्यात – NRC – CAA च्या निषेधार्थ रॅली – पहा कुठे @UmarKhalidJNU

1487
जाहिरात

चांदुर रेल्वे –

नागरीकत्व दुरूस्ती विधेयकाविरुद्ध चांदूर रेल्वे शहरात अल्पसंख्यांक समुदायातर्फे सर्वधर्माच्या लोकांचा समावेश करून काझीपुरा येथुन उद्या रविवारी दुपारी २ वाजता निषेध रॅली काढणार आहे. यामध्ये दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयु) आंदोलनातील विद्यार्थी नेता उमर खालीद प्रामुख्याने सहभागी होणार असल्यामुळे या रॅलीत विदर्भातुन प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे.

या रॅलीनंतर एनआरसी – सीएए विरोधात विविध पक्ष, संघटनांतर्फे जि.प. शाळा, चांदूर रेल्वे येथे सायंकाळी ४ वाजता आयोजित लोकजागर सभेमध्येही उमर खालीद ची तोफ कडाडणार आहे. याशिवाय याठिकाणी कॅबिनेट मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड सुध्दा उपस्थित असणार आहे. त्यामुळे हे दोघेही नेते नेमके या सभेतुन काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागुन आहे.