शहर वाहतूक शाखेची रस्ता सुरक्षा सप्ताहअंतर्गत,धडक मोहीम

0
1295
Google search engine
Google search engine

 

नवीन इंटरसेप्टर वाहनावरील तंत्रज्ञानाचा वापर

भरधाव वाहनचालकांवर कारवाईसह दंड

आकोलाः प्रतिनिधी

शहर वाहतूक शाखेद्वारा रस्ता सुरक्षा सप्ताहअंतर्गत,धडक मोहीम राबवण्यात येत आहे.यामोहीमेत वेगाने वाहन चालविणाऱ्या विरुद्ध धडक कारवाई करण्यात येऊन दंड दिल्या जात आहे.
दिनांक 11।1।20 ते 17।1।20 दरम्यान शहर वाहतूक शाखे तर्फे रास्ता सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येत आहे, त्या अंतर्गत प्रबोधनाचे कार्यक्रमांसोबतच वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहन चालकां विरुद्ध विशेष मोहीम राबवून दंडात्मक कार्यवाही सुद्धा करण्यात येत आहे,

सदर रास्ता सुरक्षा सप्ताहाचा उद्देश रस्त्या वरील अपघात कमी करण्याचा प्रयत्न करणे हा असल्याने ,शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी महामार्गावर होणारे अपघात कमी करण्याचे दृष्टीने वेगाने वाहने चालविणाऱ्या वाहन चालकां विरुद्ध विशेष मोहीम राबवून दोन दिवसात 100 चे वर कारवाया करून 1 लाख रुपयां पेक्षा जास्त दंड करण्यात आला, ह्या कामी शहर वाहतूक शाखेला प्राप्त नवीन इंटरसेप्टर वाहनावर बसविण्यात आलेल्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला, त्याच प्रमाणे अंधारात रस्त्यावर चालणारी किंवा उभी असलेली बैलबंडी दिसावी म्हणून बैलगाडी तसेच ट्रॅक्टरच्या मागील बाजूस रेडियम रिफ्लेक्टर लावण्यात आलेत, ही मोहीम पोलीस अधीक्षक अमोघ गावकर ह्यांचे निर्देशा प्रमाणे पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी राबविली।