चांदूरबाजार तालुक्यात “वाघ “की “बिबट्या “? पुन्हा दहशत फुबगाव शिवारात काळवीट व डुकराच्या पिल्ल्या ची शिकार ,वनविभागाचाप्राथमिक  अहवालच?

0
2629
Google search engine
Google search engine

चांदूरबाजार तालुक्यात “वाघ “की “बिबट्या “?
पुन्हा दहशत फुबगाव शिवारात काळवीट व डुकराच्या पिल्ल्या ची शिकार ,वनविभागाचाप्राथमिक  अहवालच?

//// प्रतिनिधी

गेल्या पंधरवड्यापासून चांदूरबाजार तालुक्यात वाघ असल्याची चर्चा सुरू असताना वाघाचे पहिली शिकार वाघाचे पहिली शिकार चर्चा सुरू असताना वाघाचे पहिली शिकार वाघाचे पहिली शिकार फुबगाव (सौदपुर)शिवारातील महादेवराव कुरवाडे आणि गजानन बोरखडे यांच्या शेतीच्या धुऱ्यावर वाघाचे पगमार्ग आढळून आले. महादेवराव कुरवाडे यांच्या शेतात काळवीट तर उमेश इंगळे याच्या शेतात एका लहान डुक्कर पिल्लाची शिकार केली असल्याचे दिसून आले.

मागील आठ ते दहा दिवसांपूर्वी दहा दिवसांपूर्वी ते दहा दिवसांपूर्वी शिरसगाव अर्डक येथील रहिवाशी गजानन वानखडे यांना प्रथम तालुक्यात वाघ असल्याचे रात्रीच्यावेळी दिसले त्यानंतर वाघ बेलोरा ते राजुरा मार्गे विषनोरा,सायवाडा या भागात गेले असल्याची चर्चा झाली. मात्र या दरम्यान वाघाने कुठे आहे ?याबाबत वनविभाग स्पष्ट माहिती देऊ शकले नाही. मात्र काल रात्री फुबगाव शेतशिवारात पुन्हा वाघाचे पगमार्ग व शिकार केलेले काळवीट आणि डुक्कर पिल्लू दिसून आले.यामुळे तालुक्यात पुन्हा वाघ परत असल्याची चर्चा जोरात रंगू लागली आहे.तर फुबगाव सैदपूर शेत शिवारातील शेतात काम करणार मजूर वर्ग वाघाच्या दहशतीच्या भीती पोटी परतले.

काल रात्री फुबगाव शिवारात आढळलेल्या काळवीट ची शिकार पाहता ही शिकार अर्थवटच करन्यात आली, तर लगतच्या गव्हाच्या शेतात आढळले पायाचे ठसे हे वाघाचे असल्याची खात्री वनविभागाने अध्यपही दिली नाही.मात्र शेतशिवर मध्ये झालेल्या शिकार मुळे परिसरात पुन्हा वाघाची दहशत असल्याचे दिसून येत आहे.वनविभागाच्या प्राथमिक अंदाज नुसार ही शिकार बिबट्याने केले असल्याची माहिती दिली.

शिरजगाव अर्डक या शेत शिवारात यापूर्वी वाघाचे ठसे दिसले होते.या नंतर वाघाचे लोकेशन नेहमी वेगवेगळ्या मिळाले .मात्र वाघ प्रत्यक्ष कोणालाच आढळून आला नाही.मात्र फुबगाव शिवारात झालेली शिकार पाहता वनविभाग तर्फे शिकार केलेल्या परिसरात ट्रॅप कॅमेरा लावण्यात येणार आहे.काळवीट ची शिकार होऊन तब्बल 12 तास नंतरही वनविभाग ची रेस्क्यू टीम आणि अधिकारी त्या घटनास्थळी पोहचले नसल्याने गावातील नागरिक मध्ये वनविभाग वर नाराजी आणि रोष व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया:-
” आढळून आलेले पगमार्ग व शिकार वरून यावरून ते जनावर बिबट्या असल्याच्या अंदाज आहे.शिकार केलेल्या ठिकाणी घटनास्थळी जनावर शोध घेण्यासाठी ट्रॅप कॅमेरा लावण्यात येत आहे.”
प्रदीप भड वनपरिक्षेत्र अधिकारी परतवाडा