अखेर लेंडीनाला रस्त्याच्या कामास सुरुवात :- प्रहारच्या आंदोलनाला यश

0
595
Google search engine
Google search engine

प्रतिनिधी –
दर्यापूर तालुक्यातील येवदा इदगाह ते लेंडीनाला हा प्रमुख रस्ता असून सदर रस्ता गेल्या २५ वर्षापासून नादुरुस्त अवस्थेत होता. प्रशासनाचे सदर रस्त्याकडे दुर्लक्ष असल्यामुळे येथून येजा करणाऱ्या वाहनांसह नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. सदर रस्त्याबाबाबतची येथील नागरिकांची गैरसोय लक्षात घेवून ह्या रस्ता दुरुस्तीबाबत प्रहारच्या वतीने प्रदीप वडतकर यांनी संबंधित प्रशासनाकडे अनेक निवेदने सादर केली. तरीसुद्धा प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे अखेर प्रहारच्या वतीने सदर रस्त्याबाबत तीव्र आंदोलन छेडून प्रशासनाचे लक्ष रस्त्याच्या समस्येकडे आकर्षित केले. प्रहारच्या आंदोलनाला अखेर यश येवून तत्कालीन आमदार रमेश बुंदिले यांनी सदर रस्तादुरुस्तीबाबत त्याच्या स्थानिक निधीतून १५ लक्ष रुपये निधी उपलब्ध करून दिला. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत प्रशासनाने सुद्धा १० लक्ष रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला. त्यानंतर प्रहारचे तीव्र आंदोलन मागे घेण्यात आले.अखेर प्रहारच्या आंदोलनाला यश प्राप्त झाले असून प्रहारच्या दणक्याने सद्यस्थितीत ईदगाह ते लेंडीनाला प्रमुख रस्त्याचे कॉंग्रेटीकरणाचे काम सुरु झाले असून त्यामुळे गावातील ग्रामस्थांना थोड्याच दिवसात रहदारीस सुसज्य असा रस्ता मिळत असल्याने नागरिकांमध्ये संतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.याच रस्त्यावरील पुलाचा प्रश्न मार्गी न लागल्याने याबाबत प्रहारचा पाठपुरावा सुरु असून प्रशासनाकडून पूल बांधण्याबाबत तात्काळ निधीची उपलब्धता करून देण्यात यावी.अन्यथा पुन्हा प्रशासनाविरोधात प्रहारच्या वतीने प्रदीप वडतकर कार्यकर्त्यांसह तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.