चांगला वक्ता होण्यासाठी सकस पुस्तके वाचा : व्ही.वाय. पाटील

Google search engine
Google search engine

चांगला वक्ता होण्यासाठी सकस पुस्तके वाचा : व्ही.वाय. पाटी

सांगली/ कडेगांव
पालकांनी विद्यार्थ्यांना मोबाईल पासून दूर ठेवले पाहिजे. मुलांच्या हातात मोबाईल नको : पुस्तके द्या . केवळ पाठांतर करून वक्ता घडत नसतो. तर चांगली पुस्तके वाचल्यानंतर वक्त्यांची निर्मिती होत असते. असे प्रतिपादन जेष्ठ विचारवंत व्ही.वाय. पाटील यांनी केले.
येथील क्रांतिसिंह नाना पाटील लोक विद्यापीठ व क्रांतिसिंह नाना पाटील सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय क्रांतिसिंह नाना पाटील स्मृती करंडक वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. पांडुरंग शितोळे होते. यावेळी अॅड. सुभाष पाटील, सुभाष पवार प्रमुख उपस्थित होते.
श्री. पाटील म्हणाले, नाना पाटील यांनी आयुष्यभर उपेक्षित वंचित समाजासाठी संघर्ष केला. स्वातंत्र्य चळवळीत व नंतर संघर्ष केला. ते उत्तम संघटक होते. चांगले वक्ते होते. त्यांची ग्रामीण बोलीभाषेतील भाषणे ही जनतेला आवडत होती. किंबहुना त्यांची सभा ऐकण्यासाठी लोक बैलगाडी तून भाषणं ऐकण्यासाठी येत असतं. त्यांची भाषणे प्ररेणादायी असतं. नेताजी बोस यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून क्रांतीचा लढा उभारला. त्यांचे स्मारण होण आवश्यक आहे.
प्रा. शितोळे म्हणाले, मुलांनी कलेची आवड जोपासली पाहिजे. विद्यार्थ्यांनी नाना पाटील यांच्या भाषणांचा नव्याने अभ्यास करण्याची गरज आहे.
यावेळी अक्षय पाटील , श्रेया विभूते यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी इंद्रजीत पाटील, दीपक पवार सौ. आनंदी पाटील, स्नेहल पवार,विजय महिंद, वंदना पाटील, रविंद्र कांबळे यांच्यासह विद्यार्थी पालक उपस्थित होते. आभार ग्रंथपाल रेखा मोरे यांनी मानले.