जिल्हा नियोजन समितीमध्ये आमदार देवेंद्र भुयार यांनी मांडली आक्रमक भूमिका – मोर्शी वरुड तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ मदतीसाठी केली निधीची मागणी !

0
3351
Google search engine
Google search engine

रुपेश वाळके विशेष प्रतिनिधी /

मोर्शी वरुड तालुका आधीच ड्राय झोनमुळे संकटात असून भीषण दुष्काळामुळे मोर्शी वरुड तालुक्यातील हजारो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची लाखो संत्रा झाडे वाळली त्यामध्ये मोर्शी वरुड तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले , त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी चांगलाच संकटात सापडला आहे या शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी अमरावती  येथे झालेल्या जिल्हा नियोजन बैठकीमध्ये आमदार देवेंद्र भुयार यांनी मोर्शी वरुड तालुक्यातील शेतकऱ्यांचे गारपीट मुळे झालेले संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान ,  ओल्या दुष्काळामुळे संत्राची फळगळ मोठ्या प्रमाणात झाली , कपाशीचे बोण्डे सोडली , सोयाबीनला कोंब फुटली , ज्वारी काळी पडली , त्यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तरीही शासकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजी पणामुळे सर्वेक्षण करण्यात आले नसल्याची बाब उघडकीस येताच देवेंद्र भुयार यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले .

भीषण दुष्काळामुळे वाळलेल्या संत्रा झाडांना मदत मिळावी यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी आक्रमक भूमिका मांडली .

२०१६ पासून प्रलंबित असलेल्या खचलेल्या विहिरींचे प्रस्ताव तात्काळ मंजूर करावे , शेतकऱ्यांच्या  शेतीतील सिंगल फेज लाईनचे काम तात्काळ पूर्ण करून सिंगल फेज चालू करावे , मोर्शी वरुड तालुक्यात ४३ हजाराच्या हेक्टरवर संत्रा पीक घेतले जात असून शेतकऱ्यांना रात्रीला वीज मिळत आहे रात्रीचे भारनियमन बंद करून शेतकऱ्यांना दिवसाने वीज पुरवठा करण्यात यावा , आदिवासी बांधवांना कोणत्याही योजनेसाठी धारणी येथे जावे लागत असल्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आदिवासी विभागाचे सहाय्यक प्रकल्प कार्यालय मोर्शी येथे सुरू करावे , ७० गाव पाणी पुरवठा योजना यासह विविध विषयांवर आमदार देवेंद्र भुयार यांनी मोर्शी वरुड मतदार संघातील विविध समस्या सोडविण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली .