बहिरम यात्रेवर पोलिसांची ड्रोन ची नजर,महिला आणि पुरुष खुफिया पोलीस यांची तैनात, ______________________________________________ चिडीमारी करणाऱ्या होणार थेट कार्यवाही:- ठाणेदार गोपाल उपाध्याय ____________________

0
692
Google search engine
Google search engine

बहिरम यात्रेवर पोलिसांची ड्रोन ची नजर,महिला आणि पुरुष खुफिया पोलीस यांची तैनात,
______________________________________________
चिडीमारी करणाऱ्या होणार थेट कार्यवाही:- ठाणेदार गोपाल उपाध्याय
________________________________________________________

:-चांदुर बाजार प्रतिनिधी

विदर्भातील सर्वात मोठी समजली जाणारी आणि प्रसिद्धी असलेली बहिरम या सातपुड्याच्या पायथ्याशी असलेली भैरव यात्रा उद्याला 26जानेवारी आणि आठवड्याचा सुट्टीचा दिवस रविवार असल्यामुळे अधिक गर्दी राहणार आहे या दृष्टीने पोलिस विभाग सुद्धा सतर्क असल्याचे ठाणेदार गोपाल उपाध्याय यांनी  सांगितले.

          सातपुडा सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले आणि अमरावती जिल्ह्यातील सुप्रसिद्ध भैरव (बहिरम)बाबा यात्रेची सुरुवात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होत असते तर फेब्रुवारी च्या सुरुवातीला या आठवड्याची सांगता होते. याठिकाणी विदर्भातूनच नव्हे तर इतर ठिकाणाहून देखील भक्तांची गर्दी पाहायला मिळते तर या ठिकाणी थडी मध्ये हंडी मधील मटण  आणि रोडगे सुप्रसिद्ध असल्यामुळे भाविकांचे आणि नागरिकांच्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते.

                                    जवळपास दीड महिना चालनाऱ्या यात्रांमध्ये पोलिसांना सुद्धा चांगलीच कसरत करावी लागते. तर कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांची सुद्धा या ठिकाणी चांगलीच धावपळ पाहायला मिळते. आज दिनांक 26 जानेवारी असल्यामुळे या दिवशी कार्यालयात सुट्टी आहेच त्याच प्रमाणे महाविद्यालय शाळेला देखील सुट्टी असल्याने बहिरम या ठिकाणी  मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी राहणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यादृष्टीने पोलिस विभाग सुद्धा सुद्धा विभाग सुद्धा सुद्धा सतर्क झाले असून यात्रे दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ड्रोन कॅमेरा तसेच पोलीस विभागातील खुफिया पोलीस अधिकारी यांची ड्युटी फिक्स पॉइंट तयार करून लावण्यात येणार असल्याची  माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. तर महिलांच्या सुरक्षिततेसाठी महिला पोलीस देखील तैनात  राहणार आहे.

                          चिडीमारी आणि बदमाशी करणाऱ्यावर लगेच कारवाई करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने लोकांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे .दरम्यान अतिरिक्त पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात ठिकाणी तैनात करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे यात्रेत जात असाल तर पोलिसांची सहकार्य आणि त्यांच्या कारवाईची भीती मनात असू द्या असे दिसत आहे मनात असू द्या असे दिसत आहे दिसत आहे.

ठाणेदार प्रतिक्रिया ****************

उदयाला 26 जानेवारी आणि आठवड्याचा रविवार सुट्टी चा दिवस असल्यामुळे  बहिरम या ठिकाणी 2 लाखाच्या जवळपास लोक येण्याची प्राथमिक शक्यता आहे.त्या दृष्टीने ड्रोन आणि नागरिकांच्या सुरक्षा साठी खुफिया पोलीस तैनात करणयात आले आहे.तसेच कुठल्याही अनुचित प्रकार घडू नये या साठी पोलीस विभाग सतर्क असून अवैध धंदे आणि चिडीमारी करणाऱ्या कार्यवाही केली जाईल.तसेच नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे.

<span;>गोपाल उपाध्याय ठाणेदार शिरजगाव कसबा</span;>