शेतकरी यांना शेती करिता 15 मार्च पर्यत दिवसाला वीजपुरवठा स्वराज्य संस्थाने निवेदन देऊन केली होती मागणी ऊर्जा मंत्री यांनी घेतली दखल

0
1170
Google search engine
Google search engine

शेतकरी यांना शेती करिता 15 मार्च पर्यत दिवसाला वीजपुरवठा
स्वराज्य संस्थाने निवेदन देऊन केली होती मागणी ऊर्जा मंत्री यांनी घेतली दखल

चांदुर बाजार

सध्या संपूर्ण महाराष्ट्र सह अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पिकाला पाणी देणे सुरू आहे.बागायती पिकांना वेळेवर पाणी मिळावे या करिता स्वराज संस्थाने महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत याना दिनांक 20 जानेवारी ला निवेदन देऊन शेतीला दिवसाला वीजपुरवठा देण्याबाबत मागणी केली होती.याची दखल घेत ऊर्जा मंत्री यांनी 15 मार्च पर्यंत शेतीच्या भारनियमन मध्ये बदल करण्याचे निर्देश दिले आहे.

शेतकरी या दिवसभर आपल्या शेतात काम करतो आणि महावितरण च्या रात्री च्या मिळत असलेल्या वीज पुरवठा मुळे त्याला दिवसा बरोबर रात्रीला देखील शेतात काम करावे लागत आहे.भारत हा कृषी प्रधान देश म्हणून फक्त कागदोपत्री असल्याचे दिसते.सध्या महाराष्ट्र मध्ये संत्रा फळबाग,गहू, हरभरा, या पिकांची पाणी ची आवश्यकता असून शेतकरी याला दिवसाला वीजपुरवठा मिळाला तर त्याला रात्रीला उदभवणारा शेती मधील प्राण्याचा धोका राहणार नाही.आणि निदान रात्रीला तरी शेतकरी हा आपला वेळ आपल्या परिवाराला देऊ शकेल.

सध्या महाराष्ट्र मध्ये आणि अमरावती जिल्हा त कांदा लागवड ला सुरुवात झाली असून कांद्याची भाव वाढले की अनेक जण भाव कमी करण्यासाठी आंदोलन करत असतात.मात्र एकरी 60000 ते 70000 हजार खर्च येणार्या कांदा लागवड मुळे भारनियमन च्या त्रास मुळे शेतकरी याना त्रास होत आहे तसेच याचा त्यांना मानसिक आणि आर्थिक त्रास देखील होत आहे.या कडे कोणाचे लक्ष नसल्याचे दिसून येते.त्यामुळे शेतकरी याना दिवसाला वीजपुरवठा करण्यात यावा अशी मागणी स्वराज्य संस्थेचे अध्यक्ष सूरज देव्हाते,सचिव बादल डकरे,उपाध्यक्ष शशिकांत निचत ,वैभव उमक यांनी ऊर्जामंत्री यांच्या कडे केली होती.

बॉक्समध्ये
रात्रीला वीजपुरवठा होत असल्याने नादुरुस्त रोहित्र मुळे शेतकरी याना मध्य रात्री रोहित्र बिघाड झाले असल्यास स्वतः जीव धोक्यात घालून दुरुस्ती करवी लागते.त्यामुळे या नादुरुस्त रोहित्र देखील दुरुस्ती करण्याची मागणी संस्थेने ऊर्जा मंत्री यांच्या कडे केली होती.