शब्दसृष्टी साहित्य रत्न पुरस्कार जाहीर चौथ्या राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य संमेलनात होणार वितरण

0
711
Google search engine
Google search engine

अकोटःसंतोष विणके

– शब्दसृष्टी बहुउद्देशीय युवा संस्थेतर्फे साहित्य कृतींना देण्यात येणाºया शब्दसृष्टी साहित्य रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आले. या पुरस्काराचे वितरण वाशिम येथील सावित्रीबाई फुुले महिला महाविद्यालयात २ फेब्रुवारी रोजी आयोजित चौथ्या राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य संमेलनात होणार आहे.

पुरस्कारामध्ये कादंबरी विभागात धम्मज्योती कांबळे, वाशिम- करपलेले कोंब, अपूर्ण शून्य- रमेश डोंगरे, गणेश निकम- शून्य सावली, ललितमध्ये रवींद्र जवादे- दिवे लागण, डॉ. प्रतिभा जाधव, नाशिक- काळोखाला दूर सारून, विद्याधर बनसोड, चंद्रपूर- तू, कथेमध्ये दिवाकर सदांशिव- सटवाई, सुनील जाधव- माउली या साहित्य कृतीला पुरस्कार जाहीर झाला आहे. कवितेमध्ये संदिप धावडे- वावरातल्या रेघोट्या, नीलेश कवठे- दगान, संजय चौधरी- कविताच माझी कबर, गझल- बबन धुमाळ- हे बंध वेदनेचे, चारोळी- माधुरी बागडे-ऋजुला, संकीर्ण-डॉ. विनय दांदळे- आयुर्वेद सर्वांसाठी, दिवाळी अंक- अविनाश लांडकर- व्हाइट स्पेस दिवाळी अंक,

आत्मचरित्र- संघर्षातून यशाकडे-भाऊसाहेब जानोळकर, आध्यात्मिक जीवन गौरव- इदं न मम- एस. के. कदम यांना मान्यवरांच्या हस्ते शब्दसृष्टी साहित्य रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे, असे संतोष इंगळे, सूर्यकांत शास्त्री यांनी कळविले आहे.