श्री स्वामी विवेकानंद इंग्लिश हायस्कुल चे 30 वे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात .

558

.
आकोटः संतोष विणके

स्वामि  विवेकानंद इंग्लिश हायस्कुलचे 30 वे वार्षिक स्नेहसंमेलन श्री क्षेत्र श्रद्धासागर येथे उत्साहात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री दिलीप अग्रवाल तर प्रमुख अतिथी म्हणून

मा. माजी राज्यमंत्री तथा पदवीधर शिक्षक आमदार विधान परिषद श्री रणजित पाटील , श्री पुरुषोत्तम चौखंडे, शाळा समिती चेअरमन तथा उपाध्यक्ष श्री पुरुषोत्तम मुरकुटे, उपाध्यक्ष दिलीप चावडा सचिव मोबीन शेख कोषाध्यक्ष मेहुल नगदिया प्राचार्य सुनील वसू, मुख्याध्यापिका कामिनी चांडक आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रमुख अतिथी यांनी आई व वडिलांचे संस्कार मुलांना कसे परिपक्व करतात याचे महत्व विशद करून आपल्या शब्दसुमनांनी सर्व पालक श्रोत्यांचे स्वागत केले. व आपल्या शब्दातून शालेय कार्यपद्धती, विद्यार्थ्यांमधील सुप्तगुणांचा उजाळा, या मध्ये शिक्षकांची भूमिका खूप मोलाची आहे असे प्रतिपादन करत त्यांचे स्वागत केले.

स्नेहसंमेलनाचा द्वितीय दिवस “भारत दर्शन” या थीमवरील समारोह रोमहर्षक ठरला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती पोलीस निरीक्षक श्री संतोष महल्ले गटशिक्षणाधिकारी श्री गजानन सावरकर यांनी उपस्थित पालकांना मोलाचे मार्गदर्शन करत आपल्या पाल्याला मोबाईलपासुन कसे दूर ठेवता येईल याकडे लक्ष वेधले.

या दोन दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका प्रतिभा आवंडकर, कु. आस्मा शेख तथा विद्यार्थी कु. अंजली जेस्वानी, राजलक्ष्मी ठाकरे, सृष्टी भिसे, रोशनी कुकडे, दीप्ती ढाकरे, प्रतीक धाकतोडे, आराध्य सांगोळे कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी मार्गदर्शक प्रमुख प्राचार्य, प्रकल्प प्रमुख शिक्षक श्री. सचिन धांडे, नुसरत अली, उमेश वाकोडे, सौ. स्वप्ना दुबे व सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

जाहिरात