उस्मानाबाद येथे मासिक पाळी व्यवस्थापन या विषयाचे एक दिवसीय प्रशिक्षण संपन्न

0
983
Google search engine
Google search engine

उस्मानाबाद येथे मासिक पाळी व्यवस्थापन या विषयाचे एक दिवसीय प्रशिक्षण संपन्न

उस्मानाबाद / प्रतिनीधी

पंचायत समिती उस्मानाबाद स्वच्छ भारत मिशन ग्राम विभागामार्फत उस्मानाबाद तालुक्यातील 550 महिलांना मासिक पाळी व्यवस्थापन या विषयावर दिनांक 28 /1/ २020 वार ( मंगळवार) रोजी उस्मानाबाद येथे पुष्पक मंगल कार्यालय या ठिकाणी जनजागृती कार्यक्रम झाला. याबाबत अधिक माहिती अशी की शाश्वत स्वच्छतेच्या अनुषंगाने वयक्तिक स्वच्छतेचे महिला व मुलीच्या आरोग्य आणि आत्मसन्मानासाठी मासिक पाळी दरम्यान स्वच्छता व आरोग्याबाबत हाताळणे बाबत जाणीव जागृती निर्माण करणे बाबत जिल्हा परिषद उस्मानाबाद स्वच्छ व पाणी पुरवठा विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती उस्मानाबाद मार्फत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात उस्मानाबाद तालुक्यातील प्रत्येक गावच्या पाच महिलांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली होती यात अशा वर्कर अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस बचत गटाची प्रतिनिधी स्थानिक स्वराज्य स्वराज्य संस्थांमधील एक महिला प्रतिनिधी या महिलांचा या कार्यक्रमात समावेश होता या महिलांना माननीय डॉ. संजय कोलते साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद उस्मानाबाद यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. अस्मिता कांबळे यांनीही मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य सौ उषाताई यरकळ तसेच पंचायत समिती सभापती सौ चांदणे ताई व पंचायत समिती उपसभापती श्री संजय काका लोखंडे व माननिय उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग श्री कुंभार साहेब तसेच युनिसेफचे प्रशिक्षक आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी पंचायत समिती उस्मानाबाद येथील गट विकास अधिकारी समृद्धी दिवाणे व सहाय्यक गटविकास अधीकारी श्री तायडे एस डी. यांनी विशेष परिश्रम घेतले.