अवैध धंदे करणाऱ्या सोबत तहसीलदार यांचे हितसंबंध ? तहसीलदार यांना मुख्यलयीन ठेवा शिवसेना आणि युवसेनेची मागणी अन्यथा तहसील कार्यलाय ला टाळा ठोकू

0
887
Google search engine
Google search engine

अवैध धंदे करणाऱ्या सोबत तहसीलदार यांचे हितसंबंध ?

तहसीलदार यांना मुख्यलयीन ठेवा शिवसेना आणि युवसेनेची मागणी
अन्यथा तहसील कार्यलाय ला टाळा ठोकू

चांदुर बाजार:-

तहसीलदार हा तालुका प्रमुख अधिकरी म्हणून काम पाहत असतो तर तालुका दंडाधिकारी म्हणून सुद्धा त्याची नेमणूक असते मात्र काही दिवसांपासून चांदुर बाजार तालुक्यातील गौण खनिज,वाळू तस्करी ही जोरात सुरू आहे तसेच शासकीय धान्य गोदाम वर सुद्धा रामभरोसे असून यावर तहसीलदार यांचे नियोजन नसल्याचे दिसत आहे.तसेच मागील महिन्यात तहसील कार्यलाय मधून जप्त केलेल्या वाहनातून रेती चोरीला गेल्याची घटना घडली त्यामुळे तहसीलदार हे यांच्या नियंत्रण ठेवण्यासाठी अपुरे ठरत असल्याचे चित्र स्पस्ट आहे.

चांदुर बाजार या ठिकाणी अनेक वेळा जातीय तसेच धार्मिक तणाव निर्माण झाले आहे.तेंव्हा तालुका दंडाधिकारी म्हणून तहसीलदार यांची भूमिका ही महत्त्वाची असते मात्र चांदुर बाजार चे तहसीलदार उमेश खोडके हे मुख्यलयीन राहत नसल्याने तालुका दंडाधिकारी म्हणून त्याचे तालुक्यावर नियंत्रण नसल्याचे या निवेदन मध्ये म्हटले आहे.

तालुक्यातील अवैध गौण खनिज तस्करी तसेच शासकीय धान्य,आणि अवैध गुटखा तस्करी यांच्या सोबत हितसंबंध जोपासता यावे यासाठी तर ते दुसऱ्या शहरात वास्तव करीत नाही असा प्रश्न देखील त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात उपस्थित केला आहे.तहसीलदार यांना बंगला देखील या तहसीलदार यांच्या अनियमित पणा मुळे उजाड झाला असून त्यांना मुख्यलयीन राहण्याचे आदेश देण्यात यावे तसेच असे न झाल्यानं शिवसेना आणि युवासेना आंदोलन करणार असल्याचे निवेदन मध्ये म्हटले आहे.

हे निवेदन देताना शिवसेना तालुका अध्यक्ष आशिष वाटणे युवासेना तालुका प्रमुख शैलेश पांडे,पवन राऊत उपतालुका प्रमुख युवासेना ,अभिजित गांगळवर शहर प्रमुख युवासेना तसेच चांदुर बाजार तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

बॉक्समध्ये
चांदुर बाजार ला तालुका हा मोठा असून या ठिकाणी निवासी नायब तहसीलदार हे रिक्त असल्याने या ठिकाणी मुख्य तहसीलदार यांनी मुख्यलयीन राहणे आवश्यक आहे.मात्र ते त्याच्या बगला मध्ये नियमित न राहता दुसऱ्या ठिकाण वरून येणे जाणे करतात त्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणावर अवैध फोफावले आहे.तर एक नायब तहसीलदार महिला असल्याने या ठिकानि तहसीलदार मुख्यलयीन राहणे अनिवार्य असताना देखील तहसीलदार यांचे यांच्या अनियमित पणा मुळे अवैध धंदे वाल्यानं सुगीचे दिवस आले आहे.