शांतीवन अमृत तीर्थ येथे श्रींच्या प्रगटदिन महोत्सवास प्रारंभ

799

कल्पवृक्ष सारख्या भक्ती भावाच्या धारेने शांतीवन अमृत तीर्थ प्रवाहित – राष्ट्रसंत श्री स्वामी गोविंद देव गिरीजी

आकोटः प्रतीनीधी

संत गजानन महाराज विहीर  संस्थान शांतीवन अमृत तीर्थ हे श्रींच्या कृपाप्रसादाने पावन झालेली भूमी आहे संत गजानन महाराजांच्या अध्यात्मिक प्रसादाने ऐश्वर्य प्राप्त झालेले हे पावन क्षेत्र आहे या भूमीला त्रिवार वंदन करतो असे प्रतिपादन तपोनिष्ठ राष्ट्रसंत श्री स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी प्रगटदिन महोत्सवानिमित्त आयोजित भागवत कथेचे प्रथम पुष्प गुंफताना केले. ते शांतीवन अमृततीर्थ येथे आयोजित प्रकट दिन महोत्सवानिमित्त आयोजित कथा सत्संगात बोलत होते.

कथा प्रारंभ होण्यापूर्वी कथा वाचक श्री स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या हस्ते श्रींची पूजा अर्चना करण्यात आली त्यानंतर स्वामिंनी सजल विहिरीच्या अमृत तीर्थाचा प्रसाद घेऊन विहिरीचे पूजन केले तद्नंतर कथेचे मुख्य यजमान कैलाशचंद्र अग्रवाल सौ.कुमुदिनी अग्रवाल यांनी भागवत धर्म ग्रंथ हा श्रीं च्या जयघोषात कथा कथा मंडपात आणला. यजमानांच्या हस्ते ग्रंथाचे पूजन करण्यात आले यावेळी विविध मान्यवरांच्या हस्ते स्वामीजींचे पुष्पहार व फुलांनी स्वागत करण्यात आले.त्यानंतर भागवत कथेस प्रारंभ झाला.

पुढे बोलताना स्वामी श्री गोविंद देव गिरी जी महाराज म्हणाले आपल्या सर्वाच्या भक्ती धारेमुळे भक्ती भावामुळे येथे श्रींचे प्राकट्य आहे. आपल्या सर्वांच्या धर्म भक्तीला मी नमस्कार करतो तसेच ब्रह्मस्वरूप गजानन महाराजांनाही वंदन करतो. राममंदिराचा मार्ग प्रशस्त झाला तो भक्तांच्या असिम भक्ती लाटेने प्रभू श्रीराम हे संत गजानन महाराजांचे आराध्य आहे संत गजानन महाराजांनी हजारो भक्तांची मनोकामना पूर्ण केली.

संत गजानन महाराजांची कृपा दृष्टी ही कल्पवृक्षा सारखीच आहे कल्पवृक्ष म्हणजे सर्व इच्छा पूर्ण करणारा आणि या कल्पवृक्षाचे सर्वोत्तम फळ म्हणजे भक्ती आराधना आणि हीच भक्ती आराधनेचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे भागवत कथा सर्व कथांचा सार म्हणजे भागवत कथा ज्या ठिकाणी भाव उत्कट होतो तिथे भगवान प्रकट होतात म्हणूनच म्हटल्या जाते जिथे भाव तिथे देव प्रकट होतो.त्यामुळेच हे स्थळ शांतीवन अमृत तीर्थ या नावाने प्रसिद्ध झाले आहे असे म्हणून स्वामींनी कथेच्या पहिल्या दिवसाचा समारोप केला समारोप भागवत आरती व संत गजानन महाराजांच्या आरतीने करण्यात आला

स्वामी श्री गोविंद देव गिरी महाराज राम मंदिराचे ट्रस्टी पदी

स्वामी श्री गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या कथेसाठी संस्थान हे गेल्या १० वर्षापासून प्रयत्नरत होते. स्वामींची यावर्षी मिळालेली कथा व स्वामींची अयोध्येतील राम मंदिर ट्रस्ट पदावर झालेली निवड यामुळे कथा स्थळी पहिल्याच दिवशी हजारो भाविकांनी स्वामींचे जल्लोषात स्वागत केले. तर संस्थांच्या वतीने त्यांच्या निवडीने निमित्त अध्यक्ष श्री नारायणराव इंगळे व इतर विश्वस्तांच्या वतीने त्यांचा ह्रदय सत्कार करण्यात आला.

प्रथम पुष्प प्रस्तावनाही हभप विठ्ठल महाराज साबळे शोभाताई बोडखे यांनी तर समारोप गजानन धर्मे यांनी केला. कथाश्रवणास पहिल्या दिवशी भाविकांच्या अलोट जनसागर उसळला होता.

जाहिरात