श्री शिवाजी महाविद्यालयात इंग्रजी काव्यवाचन स्पर्धा

0
599
Google search engine
Google search engine

 

अकोटःसंतोष विणके

येथील श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आकोट येथे येथे इंग्रजी विभागातर्फे इंग्रजी काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन प्राचार्य डॉ ए. एल. कुलट यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ राहुल सुडके, प्रा. दीपक वानखडे, प्रा. गजानन तायडे व्यासपीठावर उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये एकूण 15 विद्यार्थ्यांनी स्पर्धक म्हणून काव्यवाचन केले. कार्यक्रमाचे संयोजक म्हणून प्रा दीपक वानखडे यांनी जबाबदारी पार पाडली तर परीक्षक म्हणून प्रा गजानन तायडे व सागर इंगळे यांनी काम पाहिले. सदर स्पर्धेमध्ये इंग्रजी सोबतच हिंदी, मराठी भाषेतून स्पर्धकांनी काव्यवाचन केले. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक रेखा पातोंड, द्वितीय क्रमांक

. ऋतुजा मुऱ्हेकर, तृतीय क्रमांक सुष्मिता शिवरकर हिने पटकाविला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्वेता डोबाळे व इतर प्राध्यापक यांनी मोलाचे सहकार्य केले. असे प्रसिद्धी प्रमुख प्रा अरूण हिंगणकर कळवितात.