*शेतकऱ्यांनी गट तयार करून एकत्र व्हावे:- माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे ◆● वरुड येथे एक दिवसीय संत्रा निर्यात कार्यशाळा संपन्न*

0
594
Google search engine
Google search engine

*वरुड:-*
वरुड व मोर्शीला संत्राचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जातो, या भागात संत्रा उत्पादन भरपूर प्रमाणात होते. त्याकरिता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी शेतमाल पणन प्रक्रिया सहकारी संस्था, महा एफ. पी. ओ. फेडरेशन पुणे व कोगो पोर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने वरुड मोर्शीतील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिवसीय कार्यशालेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेमध्ये शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्याकरिता माजी कृषिमंत्री म. रा. डॉ. श्री. अनिल बोंडे, माजी कृषी आयुक्त श्री. पांडुरंग वाठारकर, पणन चे विभागीय व्यवस्थापक श्री. डागा, सहकाराचे विभागीय व्यवस्थापक श्री. बेदरकर कीटक शास्त्रज्ञ डॉ. शाम लुंगे, उन्नत भारत अभियानाच्या श्रीमती बारब्दे, जेष्ठ शेतकरी श्री. देशमुख यांची उपस्थिती होती. या कार्यशाळेमध्ये विखुरलेल्या शेतकऱ्यांनी आपले स्वक्तचे शेतकरी गट तयार करावे. त्यातूनच FPC (फार्मा प्रोड्युसिंग कंपनी) निर्माण करावे जेणेकरून आपला संत्रा निर्यात करायला सोपे होईल. व कंपनीच्या माध्यमातून त्या पिकाला योग्य भाव मिळेल, व शेतकरी व्यापाराकडून होणाऱ्या लुटीपासून सुद्धा वाचेल, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना तसेच आपण कसे निर्यातदार होऊ शकतो या निर्यात होणाऱ्या पिकामध्ये संत्रा, हळद व मिर्ची याचा समावेश आहे, याची नोंदणी पणन संस्था मध्ये करण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले. यावेळी शेकडो संत्रा उत्पादक शेतकरी उपस्थित होते.