महसूल पथक यांना चकमा देऊन अवैध रेती वाहतूक सुरू महसूल आणि पोलीस विभाग सुस्त का ?आर्थिक व्यवहार ची चर्चा

0
951
Google search engine
Google search engine

 

चांदुर बाजार:-

30 सप्टेंबर पासून तालुक्यातील वाळू घाट लिलाव संपले आणि चांदुर बाजार तालुक्यात सुरू झाले अवैध वाळू चे मोठे रॅकेट .यामध्ये स्थानिक महसूल विभागाने कार्यवाही फक्त नावापुरत्या केल्या तर काही ठिकाणी नव्याने या व्यवसायात आलेल्या नवख्या ना आपला कार्यवाही दाखविली मात्र या व्यवसायात गब्बर झालेल्याना महसूल प्रशासन ला दम लावणे जमले नाही.त्यांत पोलिसांना ट्रॅक्टर नुसार महिन्याला देणीगी दिली जात असल्याची अवैध वाळू तस्करी करणार्याने सांगितले.

तालुक्यातील अनेक वाळू घाट मधून अवैध वाळू तस्करी सुरू आहे या प्रामुख्याने कुरलपूरणा, मासोद ,तळेगाव ,शिरजगाव कसबा, घाटलाडकी,ब्राह्मणवाडा ,देऊरवादा, कोदोरी पाळा या भागातून रेती तस्करी सुरू आहे.अनेक सरकारी कामावर अवैध वाळू टाकली जात आहे तर काही जण महसूल आणि पोलीस विभाग यांना मासिक प्रमाणे आर्थिक व्यवहार करत असल्याची चर्चा आहे.

अवैध वाळू व्यवसाय मध्ये गब्बर झालेले वाळू तस्करी करणारे हे कोणत्याना कोणत्या पक्ष चे कार्यकर्ते असल्याने त्यांना राजकीय पाठबळ मिळत असल्याची चर्चा तालुक्यात रंगत आहे तर कार्यवाही न व्हावी म्हणून राजकीय व्यक्तीचा धाक दाखविला जात आहे तर कार्यवाही झाली तर कार्यवाही पासून सुटकेसाठी पक्ष श्रेष्ठींनी सुद्धा कॉल केला जात आहे.त्यामुळे महसूल आणि पोलिस विभाग यांना सुस्त करून राजकीय पाठबळ घेत हे अवैध वाळू व्यवसाय करणारे हे गब्बर झाले आहे.

*नवीन मुलांचा सक्रिय सहभाग*

फायनान्स वर ट्रॅक्टर खरेदी करून आपला व्यवसाय सुरू करून आधीक जास्त नफा कमविण्यासाठी हा चागला मार्ग असल्याचे लक्षात येताच अनेक युवा वर्ग या व्यवसायात सक्रिय झाले आहे तर अवैध पणे वाळू तस्करी करण्यासाठी प्रत्येकी चौफुली आणि रोडवर आपले व्यक्ती ठेवून यांची तस्करी सुरू आहे.

फोटो :-बेलोरा या ठिकाणी अवैध पणे लावण्यात आलेल्या वाळूचा ढीग