श्रद्धासागर ते त्रिभूवनैक पवित्र श्री तीर्थ पुष्करणी पायदळ वारीत हजारो भक्त सहभागी

0
493
Google search engine
Google search engine

 

आकोट ः-
सद्गुरु श्री गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त श्री क्षेत्र श्रद्धासागर ते  अकोली जहागीर येथील सद्गुरुंनी सजल केलेल्या त्रिभूवनैक पवित्र श्री तीर्थ पुष्करणी पायदळ दिंडीत गजानन भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले.

श्री संत गजानन महाराज यांच्या दर्शनाकरिता टाळकरी, वारकरी, गायनाचार्य, मृदंगाचार्य, पताकधारी, अब्दागीरीधारी तथा असंख्य महिला, पुरुष, बालक, आदी भाविक भक्त जय गजाननाचा जयघोष करीत मोठ्या श्रद्धेने भागी तसेच  संत वासुदेव महाराज यांची राजवैभवी पालखी रथ दिंडी सोहळ्याने भक्तीमय वातावरण निर्माण झाले शहराच्या मुख्यमार्गावर.भाविकांनी पालखी रथाचे दर्शन घेतले.तर विविध सामाजिक व स्वयंसेवी संस्था व युवक मंडळ कार्यकर्त्यानी दिंडीकरी भाविकांसाठी पाणी,चहा,शरबत, फराळाची व्यवस्था केली.गुरुवर्य निवास मंदिर येथे अल्पसा विराम घेवून पालखी मार्गस्थ झाली .येथे माधवराव मोहोकार व पुरुषोत्तम मोहोकार यांनी पादुकांचे पुजन केले.कबुतरी मैदान येथे रामधुनु हनुमान मंदीर मंडळ पदाधिकारी व गजानन मंदीर येथे माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम चौखंडे आणि गजानन नगरवासियांनी दिंडीचे भावपुर्ण स्वागत केले.तर मार्गात लोकजागर मंच द्वारा गजाननराव बोरोकार,गावंडे व कार्यकर्त्यानी स्वागत केले..वाई फाट्यावर बंडु पाटील ठाकरे यांनी महाप्रसाद व्यवस्था केली येथे ह.भ.प. आत्माराम महाराज यांचे प्रवचन पार पडले.

दरम्यान श्री क्षेत्र श्रद्धासागर येथे पहाटे श्री गुरुमाऊलींचा रजत मुर्तीचा व पादुकांचा अभिषेक व रथपुजन संस्थाध्यक्ष ह.भ.प.वासुदेवराव महल्ले यांचे हस्ते पार पडला यावेळी संस्थेचे सचिव रविद्र वानखडे ,कोषाध्यक्ष पुरुषोत्तम लाजुरकर,सहसचिव अवि गावंडे ,विश्वस्त दादाराव पुंडेकर,सदाशीवराव पोटे,महादेवराव ठाकरे नंदकिशोर हिंगणकर ,दिलिप हरणे,अनिल कोरपे,आदी हजर होते.
ह.भ.प.अंबादास महाराज यांचे मार्गदर्शनाखाली दिंडी सोहळा पार पडाला.

श्री गजानन महाराज संस्थान शेगांव द्वारा विहीर संस्थान द्वारा अकोली जहागीर येथे आयोजित प्रगटदिन सोहळ्यात दिंडी सोहळा सहभागी झाला.

————————-