समाजकल्याण विभागाच्या विविध योजना लोकांच्या पर्यंत पोहचविण्यासाठी विशेष मोहीम सुरू

0
551
Google search engine
Google search engine

सांगली/ कडेगांव
समाजकल्याण विभागाकडून शासकीय योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहचविण्याचा उपक्रमाची सुरुवात सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग यांच्याद्वारे सुरू आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विविध शासकीय योजनांची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत तसेच शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचा उपक्रम सुरू आहे. सहाय्यक आयुक्त समाजकल्याण अर्जुन बन्ने, समाजकल्याण अधिकारी सचिन साळे, तसेच सचिन पिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली माहिती आणि चित्ररथ कडेगाव, पलूस तालुक्यात फिरवला जात आहे.
समाजकल्याण समन्वयक दिग्विजय झेंडे, दत्तात्रय काचळे, विशाल नेटके यांच्या साहाय्याने एल इ डी व्हॅन च्या साहाय्याने संपूर्ण कडेगाव व पलूस तालुक्यातील विविध गावात पोहचविण्याचे काम जोमाने सुरू आहे. सोबत माहिती पुस्तकांचे मोफत वाटप केले जात आहे. या उपक्रमाचे विविध शाळा, ग्रामस्थ यांच्या कडून कौतुक होत आहे.