जीवनात त्यागा शिवाय ध्येय प्राप्ती नाही! –ह.भ.प.श्री ज्ञानेश्वर माऊली कु-हाडे

0
1218
Google search engine
Google search engine

गुरुमाऊली जयंती महोत्सव
श्री ज्ञानेश्वरी भावकथा-६वे
————————-
आकोटःसंतोष विणके
जीवनात काही तरी मिळविण्यासाठी त्याग हा करावा लागतो. ध्येय जेवढे मोठे तेवढाच त्याग मोठा असतो.जीवन सार्थ ठरविण्साठी परमार्थिक मार्गावर वाटचाल करतांना आसूरी संपत्तीचा त्याग करुन दैवी संपत्ती धारण करा.ईश्वर प्राप्तीकरीता विषयान्मुख आसक्तीचा त्याग करा तरच ईश्वर प्राप्ती होईल असे चिंतन श्री ज्ञानेश्वरीचे चिंतक श्री ज्ञानेश्वर माऊली कु-हाडे यांनी प्रगट केले.

गुरुमाऊली जयंती महोत्सवात गत १९ एप्रिलपासून सुरु असलेल्या श्री ज्ञानेश्वरी भावकथा निरुपणाचे सहावे व उपांत्य पुष्प गुंफतांना ज्ञानेश्वर माऊली कु-हाडे बोलत होते.ज्ञानेश्वरी भाव कथेचा आशय सांगत त्यांनी विविध दृष्टांतून सिंधान्त पटवून दिला ते पुढे म्हणाले.त्याग कुठला करावा याचं ज्ञान आवश्यक आहे.जीवनात ज्ञान नसेल तर पदरात काहीच पडणार नाही.श्री ज्ञानेश्वरीत २६प्रकारची दैवी संपत्ती व ६ प्रकारची आसूरी संपत्ती व त्यांची लक्षणे सांगितले आहे.दैवी संपत्ती सद्गुणांचा समुच्चय आहे. ते कळण्यासाठी परमार्थिक चिंतन करणे क्रमप्राप्त आहे.सद्गुण अंगिकारणे म्हणजेच खरा परमार्थ आहे. या परमार्थिक प्रवासात सिद्धी प्राप्त होतात.ज्ञान तपश्चर्येतून अष्टमासिद्धी प्राप्त होते .सिद्धी म्हणजे सामर्थ.ह्या सामर्थ्याचे तेज कुठलेही प्रतिबंध दूर करुन ईश्वराकडे सहज घेवून जाते,सद्गुणात क्षमा हा गुण महत्वाचा आहे. सर्व सहन करण्याची स्थिती प्राप्त होणे म्हणजे क्षमा होय,मात्र त्याचा मोठेपणा वा गर्व मनाला शिवत नाही.कुठल्याही संकटात बिकट प्रसंगाला धैर्याने तोंड देण्यास तयार राहण्याची तयारी म्हणजेच धैर्य.परमार्थिक जीवनात जेवढे दुःख जास्त ,प्रतिबंध व प्रतिकुल प्रसंग तेवढे अंतर्मुख होता येते.दुःखात खरा परमार्थ कळतो.दुःख हे अपरिहार्य आहे.दुःखच जीवन घडविते.भौतिक दुःख ,दैवी दुःख आणि आध्यात्मिक दुःख असे तीन प्रकारचे दुःख मनावर परिणाम करीत नाही,परमार्थिक जीवन हे सोन्यासारखे शुद्ध असते.गंगाजला सारखे पवित्र असते,मनुष्य किती श्रीमंत आहे हे वाणीतील शब्दांवरुन कळते.मन शुद्ध असल्यास मुखातून श्रीमंत शब्द निघतात,तो व्यक्ती खरा श्रीमंत होय.असे महाराज म्हणाले.

गंगेचे पाणी ताप आणि पाप घेवून सागराला मिळते,गंगेचा प्रवाह जीवसृष्टीचे पोषण करते,सुर्य अंधार दूर करुन सृष्टीला प्रकाशित करते,संत महात्म्याचं जीवन सुर्यासारखं प्रखर आणि गंगेसारखं शुद्ध व पवित्र असते.प्राणिमात्राचं हित हाच संकल्प करणे म्हणजेच अद्रोहत्व गुण होय,कार्यसिद्धीचा अभिमान न ठेवणे हा अभिमानीत सद्गुण होय.ब्रम्हसंपदा हे तिर्थ आहे.हे तिर्थ धारण करुन आसूरी संपत्तीचा त्याग करा आणि ब्रम्हस्वरुप व्हा असा उपदेश ज्ञानेश्वर माऊली कु-हाडे शेवटी यांनी केला.

दरम्यान दुपारचे प्रवचनात ह.भ.प.
श्रीहरी महाराज सोनेकर यांनी गुरुमाऊली विरचित ग्रंथाची समिक्षा करुन संत आणि ग्रंथाचे महात्म्य सांगितले.
————————-