महिला व मुलीवर अन्याय झाल्यास कठोर कारवाई करु-PSI पल्लवी जाधव

0
853
Google search engine
Google search engine

रांजणी प्रतिनिधी
दि.२८-समाजात महिला व मुलीवर अन्याय व अत्याचार झाल्यास आरोपी विरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असे प्रतिपादन दामिनी पथकाच्या प्रमुख पोलिस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांनी केले.
दामिनी पथकाने गुरुवारी रांजणी येथील श्री सरस्वती भुवन हायस्कूलला भेट दिली. यावेळी शाळेच्या शिक्षिका व विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की समाजात मुली व महिलावर होणा-या अन्याय व अत्याचारामध्ये वाढ होत आहे.

त्यामुळे शालेय विद्यार्थीनींनी शिक्षणाबरोबरच आत्मरक्षणाचे धडे गिरवले पाहिजे. तसेच मुली व महिलावर अन्याय होऊ नये यासाठी मुलांना देखील चांगले शिक्षण आणि संस्कार देण्याचे आवाहन पल्लवी जाधव यांनी केले. यावेळी महिला पोलिस एस.एम.खांडेभराड, ए.डी.साबळे, आर.एल.राठोड, यु.पी.साबळे यांच्यासह व्ही.एस.तायडे पर्यवेक्षक मनोहर चित्तोडकर, कार्यालयीन अधीक्षक बंडेराव देशमुख, शिक्षिका उषा माने, सुवर्णा बैरागी, कल्याणी अक्कर, श्रीमती वायकोस, श्रीमती हांडे, विष्णू पाटील, अफसर पठाण, भगवान सोनवणे, अतुल हेलसकर आदी उपस्थित होते.