युवकांनी बलोपासनेसह निर्व्यसनी होण्याचा निश्चिय केल्यासच चंद्रशेखर आझाद यांना खरे अभिवादन होईल

0
479
Google search engine
Google search engine
हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र व कर्नाटक राज्य युवा संगठक श्री सुमित सागवेकर यांचे प्रतिपादन
अमरावती – “चंद्रशेखर आझाद हे हनुमानाचे भक्त आणि बलोपासक होते. त्यांची राष्ट्र भक्ती ही प्रखर होती आणि म्हणूनच ते क्रांतीकारकांच्या गुरुस्थानी होते. त्यांनी मोठ्या प्रमाणावर युवकांचे संगठण करून त्यांच्यामध्ये निस्सीम राष्ट्र आणि धर्मप्रेम जागवले होते. ते निर्व्यसनी होते. साहसीवृत्ती, निर्भीडता, निःस्वार्थ  राष्ट्र आणि धर्मप्रेम, राष्ट्राकरिता सर्वस्वाचा त्याग, यांसारख्या गुणांमुळे चंद्रशेखर आझाद हे भारतमातेला गुलामीच्या जोखडातून मुक्त करण्याकरिता अतुलनीय क्रांतिकार्य करू शकले. आज त्यांच्या बलिदानदिनाच्या निमित्त्याने त्यांना अभिवादन करतांना प्रत्येक युवकाने राष्ट्र आणि धर्म कार्य करण्याची शपथ घ्यावी.प्रत्येक युवकाने बलोपासना करण्याचा आणि निर्व्यसनी होण्याचा निश्चिय केल्यासच चंद्रशेखर आझाद यांना खरे अभिवादन होईल”,असे आवाहन हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र व कर्नाटक राज्य युवा संगठक श्री.सुमित सागवेकर यांनी केले.ते वडाळी परिसरातील समाजमंदिर व्यायामशाळा येथे आयोजित चंद्रशेखर बलिदान दिनानिमित्त्य आयोजित कार्यक्रमामध्ये बोलत होते. यावेळी हिंदुजनजागृती समितीचे अमरावती जिल्हा समन्वयक  सर्व श्री. निलेश टवलारे, युवा संगठक निरंजन चोडणकर, वडाळी येथील धर्मप्रेमी शिवा नायकवाड, लवकुश बेनिवाल, सौरभ बेनिवाल,नंदलाल नायकवाड, आदेश बेनिवाल,निखिल नायकवाड नायकवाड यांसह युवक उपस्थित होते.