तंबाखुमुक्त अभियान कार्यशाळा संपन्न

0
512
Google search engine
Google search engine

अकोटःसंतोष विणके

आकोटव तेल्हारा तालुक्यातील तंबाखूमुक्त अभियान राबविण्यासाठी शालेय विद्यार्थी चांगली जनजागृती करू शकतात, यासाठी विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन कसे करावे यासाठी तंबाखूमुक्त अभियान कार्यशाळा दि.03 मार्चला अकोट
शिक्षण विभागाच्या साधन केंद्रात घेण्यात आली. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाअधीकारी गजानन सावरकर साहेब उपस्थित मान्यवर संदीप मालवे साहेब, तर प्रमुख मार्गदर्शक तंबाखूमुक्त अभियानाचे जिल्हा समन्वयक रवींद्र कवाडे उपस्थित होते.
सलाम मुंबई फाउंडेशन संस्थेमार्फत जिल्ह्यात तंबाखूमुक्त शाळा अभियान चालविले जाते. त्यासाठी अकोट व तेल्हारा येथील केंद्रप्रमुख, तज्ञ शिक्षक, तंत्रस्नेही शिक्षक यांच्यासाठी कार्यशाळा घेण्यात आली. शालेय परिसर तंबाखूमुक्त राहावा याकरिता शिक्षकांनी विविध उपक्रमाचे आयोजन करावे तंबाखू किंवा व्यसन करणाऱ्याचा वाईट परिणाम कुटुंब व पर्यायाने समाजावर होतो.


निकोप समाज निर्माण करण्यासाठी सदर उपक्रम शिक्षकच राबवू शकतात असा विश्वास जिल्हा समन्वयक रवींद्र कवाडे यांनी यावेळी व्यक्त केला. कार्यक्रम गटसमन्वयक तृप्ती बीजवे मैडम यांनी कार्यक्रमाचे संचालन आणि आभार मानले.