146 गौवंश यांची जिवंत केली सुटका,एक जण ताब्यात चिंचोली काळे ते अमरावती मार्ग वरील  ग्रामीण पोलिसांची कार्यवाही

0
657
Google search engine
Google search engine

146 गौवंश यांची जिवंत केली सुटका,एक जण ताब्यात
चिंचोली काळे ते अमरावती मार्ग वरील  ग्रामीण पोलिसांची कार्यवाही

अमरावती:-

            दि.07/03/2020 रोजी चे पहाटे 01.00 वा. दरम्यान पोलीस नियंत्रण कक्ष, अमरावती ग्रामीण  यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे  चिंचोली काळे गाव परिसरात काही इसम संशयित रित्या मोठ्या प्रमाणात गोवंश जनावरे पायी हाकलत घेऊन जात असल्याची माहिती मिळाल्याने  चिंचोली काळे, ता.चांदुर बाजार गावाचे पुढे 500 मीटर अंतरावर अमरावती च्या दिशेने मोठ्या प्रमाणात काही इसम गोवंश जनावरे घेऊन जात असल्याचे दिसून आले..सदर गोवंश जनावरे संशयित रित्या कत्तली करिता घेऊन जात असल्याचा संशय आल्याने चांदुर बाजार पोलिसांनी इतर पोस्टे च्या पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या मदतीने सर्व एकूण 146 गोवंश जनावरे किंमत 1460 000/- (14 लाख 60 हजार) रुपयांच्या जनावरांची सुटका करून सुरभी गोरक्षन संस्थान बेलोरा येथे  दाखल केले. सदर गोवंश जनावरांमध्ये 3 ते 4 जनावरे एकाच दोराने बांधून व हाकलणारे इसम अनुकुचीदार टोक असलेल्या काठीने जनावरांना निर्दयतेने व अमानुषपणे घेऊन जात असल्याचे लक्षात आल्याने त्याप्रकरणी प्राणी क्लेश  प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे…याप्रकरणी एक जण ताब्यात घेण्यात आला असून इतर आरोपींचा शोध सुरु आहे….

            ही कार्यवाही पोपट अबदागिरे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी अचलपूर यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली ठाणेदार  पो.नि. उदयसिंग साळुंके सोबत सपोनि पंकज दाभाडे,  सपोनि अशोक कांबळे, पोउपनि गजानन राहाटे, सफौ. दीपक खंडारे, पोहवा  नांदुरकर, नापोका वीरेंद्र अमृतकर, नापोका अर्जुन परिहार,  चालक नापोका महेंद्र रोडे  यांनी केली.