नटराज अकॅडमी आकोट येथे जा. महीला दिन साजरा…

0
480
Google search engine
Google search engine

विविध स्पर्धांचे आयोजन

आकोटः संतोष विणके

नटराज अॕकेडमी येथे महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महिला दिनानिमित्त चित्र व रंगभरण स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा, लेक वाचवा, पर्यावरण संरक्षण, पाणी समस्या या विषयांवर ग्रिटिंग कार्ड सजावट स्पर्धा घेण्यात आली.

याप्रसंगी कला अकॅडमीचे संचालक उमेश म्हसाये यांनी मुलांना चित्र रेखाटने करून प्रत्यक्ष सादरीकरण केले. विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत थोर महिला समाजसेविका तथा आजची नारी जगात भारी असा सामाजिक संदेश देत कार्यक्रम साजरा केला

. या कार्यक्रमाला अतिथी म्हणून निखिल चौधरी विष्णू घायल कल्याणी खुमकर प्रशांत गुजर यांच्यासह इतरांची हजेरी होते संचालन उमेश म्हसाये यांनी तर आभार श्याम पाठक यांनी मानलेत.