संगीत के सितारे ने केले अकोटातील रसिकांना मंत्रमुग्ध

0
1154
Google search engine
Google search engine

आकोटःसंतोष विणके

स्थानीक शेतकरी मोटर्स, दर्यापुर रोड, अकोट येथे खास बालकलाकारांकरीता तसेच अकोट शहरातील कलाकारांकरिता दोन दिवसीय हिरो मेगा सर्व्हीस कॉनिर्वल अंतर्गत गायन, तबला व हार्मोनिअम वादन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

संस्कार भारती, रोटरी क्लब ऑफ अकोट, जेसीआय अकोट यांच्या संयुक्त विदयमाने बालकलाकारांना एक मंच उपलब्ध करुन त्यांच्या कला गुणांचा विकास व्हावा व त्यांना नवीन प्रेरणा मिळावी म्हणुन हे आयोजन करण्यात आले होते. गायन स्पर्धे मध्ये 39 स्पर्धेकांनी भाग घेतला होता यात प्रथम क्र. श्रेया पोके, व्दीतीय क्र. लोकमुद्रा बुधळकर, तृतिय क्र. वृषाली तायडे प्रोत्साहन पर स्नेहल गवई, संग्राम गावंडे, वेदांत कैलास पोके यांनी पटकाविले

.तर तबला वादनामध्ये 15 स्पर्धकांतुन प्रथम क्र.चंदन तेलगोटे, व्दितीय क्र. निनाद इंगोले, तृतीय क्र. अखिलेश कांगुळकर यांनी पटकाविले. तथा हार्मोनिअम वादनामध्ये 10 स्पर्धकांनमधुन प्रथम क्र.उत्कर्ष मोडशे, व्दितीय क्र. सर्वेश हिंगणकर, तृतीय क्र. श्रेया पोके यांनी पटकाविले.

सर्व स्पर्धकांनी आपली कला रसीक प्रेक्षकांना आपल्या कलेच्या माध्य्मातुन मंत्रमुग्ध् केले. स्पर्धेला परीक्षक म्हणुन इंगोले सर, अजय लोणकर, शशांक भावे, वैष्ण्व बोरोडे यांनी मोलाची भुमीका बजावली. कार्यक्रमाचे संचालन हरिष ढवळे, प्रवीण बनसोड, प्रवीण पुंडगे यांनी केले.


खुल्या गटा अंतर्गत अकोट शहराचे नायब तहसिलदार गुरव साहेब, मुंबई येथील कलाकार इदरिस शेख भाई, श्रदधा वानखडे, प्रज्ञा धांडे, जावेद भाई,तज्जमुल भाई , आदर्श अग्रवाल, कृष्णा नाथे, प्रतापसिंग सोळंके, अनंता काळे, रमेश बंकुवाले, राजेश गोगटे, मिलींद तेलगोटे, राजेंद्र् तेलगोटे, दिपक तळोकार, पप्पु जी वर्मा, शाम अंभोरे, संदीप ढोक, मणीश निखाडे, हेमंत लहाने,निखाडे सर यांनी सुरेल गीते सादर करुन श्रोत्यांना मंत्रमुगध् केले. शेतकरी माेटर्सचे संचालक नंदकिशोर शेगोकार यांनी खिलते है गुल यहा हे सुरेल गीत गाऊन सर्वांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता शेतकरी मोटर्सच्या सर्व कर्मचा-यांनी प्रयत्न केले.अशी माहीती रोटरीचे जनसंपर्क अधिकारी कल्पेश गुलाहे कळवितात.