श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त कार्यक्रम साजरा

0
668
Google search engine
Google search engine

 

शेगांव :- शहरात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त श्री गजानन महाराज मतिमंद विद्यालय शेगांव येथे एकता ग्रुप तर्फे साजरा करण्यात आला त्या वेळी नगराध्यक्षा शकुंतलाताई बुच यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सौ. प्रीती शेगोकार, गजानन जवंजाळ, पवन महाराज शर्मा, लिओचे मयुर पाटील, संतोष सारवान, लखन पिवाल, मंगेश पाटील, सोनू सारावान उपस्थित होते.

अभिवादनानंतर महाराजांवर सुंदर असे व्याख्यान नागपूरचे गजानन वाघ यांनी सादर केले त्यावेळी ते म्हणाले, महाराजांच्या जयंती निमित्त असा उपक्रम कदाचितच कोणी केला असावा, या नवीन तरुण पिढीने एक असाचं आदर्श ठेवत अशीही जयंती आपण साजरी करू शकतो अशी एक दिशा समाजापुढे मांडली तसेच एकता ग्रुपचे कौतुक केले.

ज्या मतिमंद मुलानं समोर शेगावातील एकता ग्रुपने हा उपक्रम केला, व्याख्याने आयोजित केली गेली, एकता ग्रुपच्या या तरुणांनी या मुलांसोबत जेवणाचा आनंद घेतला या माध्यामातून या ग्रुप मुळे या मुलं मध्ये आपुलकीची भावना दिसत होती. या उपक्रमामुळे गृपचे सर्वत्र कौतुक होत आहे. सोबत कार्यक्रमात उपस्थिती पाहुण्यांनी सुद्धा यांचे अभीनंदन केले.

ज्यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी कुशाल सारवानं, राम तायडे, सागर चव्हाण, शृतीम भांड पाटील, शुभम पाटील, कृष्णा मानकर, मनिष धांडोरे, साहिल चावरे, राज वादवानी, प्रदीप मुंडे, निलेश शिंदे, अजय नसुरडे, निखिल भालेराव, गोपाल तायडे, आकाश शर्ते, आदित्य ठाकूर, विवेक तायडे, शिवा ठाकूर, श्रीकांत नटकुट, शिवल्या नटकुट, शुभम चावरे, आर्यन शर्मा, रवी सायखेडे, गजानन परियल, करण गुरव, रोहित सारवन, चेतन तायडे या एकता ग्रुपच्या मावळ्यांनी परिश्रम घेतले.