अन्नाविना उपाशी असणार्‍या वृद्ध गोरगरीब शेजार्‍यांच्या मदतीला हार्दिक सूचक यांचा हाथ

0
726
Google search engine
Google search engine

सिंदेवाही- गेल्या काही दिवसांपासुन देशभरात पसरत चाललेल्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावावर उपाययोजनात्मक खबरदारी म्हणून मा. पंतप्रधानानी संपूर्ण देशभरात लॉक डाउन घोषित केले आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये रोजच्या रोजंदारीवर पोट असणार्‍या गोरगरिबांना उपासमारीला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र सिंदेवाही तालुक्यात गेली काही दिसून येत होते. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत असतांना, समाजाला आपले काही देणे लागते आपल्या सभोवतीच्या परिसरात रहाणारे हे लोकही या भयावह परिस्थितीत हतबल आहेत. हे ओळखून शहरात सामाजिक कार्यासाठी तत्पर असणारे आणि उपेक्षितांच्या हाकेला नेहमी धावून जाणारे काही समाजप्रेमी श्री, हार्दिक दीपक सूचक यांच्यासारख्याच्या रुपाने आजही मानवतावादी संदेश घेऊन वावरत आहेत हे बघुन आत्मिक आनंद होते.
तालुक्यातील काही बांधवांना लॉक डाउन मुळे उपासमारीची वेळ आली आहे. आणि त्यांना अन्नाविना दिवस काढावा लागत आहे. अशी माहिती श्री हार्दिक सूचक यांच्या कानावर पडली आणि क्षणाचाही विचार न करता अशा गरीब बांधवांना आपण जेवण दिले पाहिजे या तळमळीने त्यांनी शहरात एक स्तुत्य मानवतावादी उपक्रम सुरू केला आणि ज्या बांधवांना अन्नासाठी वणवण करावी लागत आहे अशांनी मला फोन करून संपर्क करा तुम्हाला तुमच्या घरपोच जेवण पोहोचविण्याची जबाबदारी माझी. असे संदेश त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातुन सर्वत्र पसरविले आणि त्यांच्या या उपक्रमाला साद घालत अनेक अन्नाविना उपाशी असणार्‍या वृद्ध गोरगरीबबांधवांनी शेजार्‍यांच्या मदतीने हार्दिक सूचक यांना संपर्क केला व स्वत:च्या पोटाची खळगी भरण्यासाठी आवश्यक अन्न घरपोच मिळविला.
याची प्रचिती सिंदेवाही शहरातील इंदिरानगर वार्ड, जाटलापुर, ढीवर मोहल्ला वार्ड येथे पहायला मिळाली. यामध्ये श्री नकटुजी डहारे, वच्छलाबाई बारसागडे, संभाजी चंदनखेडे, मेश्रामबाई यांना श्री हार्दिक सूचक यांनी स्वतः घरपोच अनाज नेऊन दिला.
यामध्ये त्यांनी ०२ किलो तांदूळ, ०१ किलो पिट , ०१ किलो कांदे ०१ किलो आलू, ०१.५ किलो तुरिची दाळ, ०१.५ लीटर तेल, मीठ, मसाले, मिर्च पावडर, हळद, डेटॉल साबन इ. त्यात समावेश होता. अशा या संयमाच्या कठीण काळात त्यांच्यासाथीला श्री. निकु भैसारे आणि श्री. रवि वानकर यांनीही सहकार्य केले. तसेच यापुढे हे मानवतावादी कार्य चालू राहील असे सांगताना सामाजिक कार्यकर्ते श्री हार्दिक सूचक यांनी सिंदेवाही शहरवासियांना आव्हान केले आहे की, आपल्या गावात, आपल्या घराजवळ अन्नधान्य नसल्यामुळे कुणी उपाशी असेल तर त्याची माहिती कृपया मला देवून सेवेची संधी द्यावी. असे ते घरोघरी अनाज देतांना बोलत होते.

गरजूंनी संपर्क साधा.
*हार्दिक दीपक सुचक*
+918975440055, +919359985553