अकोटमध्ये नागरीकांचे सोशल डिस्टनिंगला प्राधान्य

0
918
Google search engine
Google search engine

आकोटःसंतोष विणके

प्रशासनाच्या सुचनांचं पालन करणं गरजेचं

कोरोना महामारीच्या संकटामुळे देशात लॉक डाऊन लागू करण्यात आला आहे.अकोट शहरातही कडकडीत संचारबंदी पाळली जात आहे. तर जीवनाश्यक वस्तू घेण्यासाठी सकाळी मिळणाऱ्या सूट मध्ये अनेक ठिकाणी नागरिक सोशल डीस्टनिंगला प्राधान्य देत असल्याचे दिसुन येत आहे. तसेच नागरिक खबरदारीचा उपाय पाळत आपल्या अत्यावश्यक गरजा भागवत आहेत.

काही आस्थापनांनी गर्दी टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेत चुन्याच्या पट्ट्याचे चौकोन आखले आहेत तर प्रशासनानेही शहरात विविध निर्धारित ठिकाणी भाजीबाजार लावण्याचे आदेश दिले आहेत.प्रशासन वारंवार लोकांना गर्दी टाळण्याचे व विनाकारण बाहेर न पडण्याच्या सतत सूचना देत आहे मात्र अशातही काही ठीकाणी नागरीकांचा बेशिस्तपणा दिसत आहे.

दरम्यान अकोट नगरपालिका च्या वतीने विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत.तसेच खबरदारीचे उपाय म्हणून सॕनिटायजेशन व फवारणी करत आहे. पालिकेच्या वतीने बाहेर जिल्ह्यातून आलेल्याचा सर्वे करून माहिती घेतल्या जात आहे. सुट कालावधीमध्ये नागरीकांनी योग्य अंतर राखून विनाकारण रस्त्यावर न येता शासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करून समाज,देश,कुटुंब सुरक्षित राखण्यास प्राधान्य द्यावं अशीच आता सर्वसामान्यांची भावना आहे.