*प्रत्येक आरोग्य केंद्राला पल्सऑक्सिमेट उपलब्ध करून द्वावे – माजी कृषिमंत्री डॉ.श्री अनिल बोंडे >< वरुड – मोर्शी तालुक्याचा घेतला आढावा*

0
536
Google search engine
Google search engine

 

*वरुड\मोर्शी :-*
कोरोना विषाणूचा देशात व राज्यात वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी मोर्शी व वरुड तालुक्याचा आढावा घेतला. महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधित रुग्णाची संख्या वाढली असून त्या कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यास सांगितले.
माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी तहसील कार्यालय मोर्शी व नगरपरिषद कार्यालय शेंदुरजनाघाट येथे आढावा बैठक घेतली. अमरावती जिल्हात एकही कोरोना बाधित रुग्ण दिसून आला नाही परतू मोर्शी व वरुड तालुक्याला लागून मध्यप्रदेश असल्याने मध्यप्रदेश मधून येणाऱ्या मजुरांची संख्या भरपूर आहे. त्यामुळे प्रशासनाने कडक पाहरा हा सीमा भागावर ठेवला आहे. परंतु काही मजूर आडमार्गाने सुद्धा जिल्ह्यात येत आहे. त्यामुळे त्यांना कोरोनटैन करून त्याना समाजापासून वेगळे ठेवण्याची व्यवस्था करण्याचे माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी सांगितले. प्रत्येक ग्रामीण रुग्णालयाला पल्सऑक्सिमेट उपलब्ध करून द्यावे व जील्ह्याचा सीमेवरील पोलीस कर्मचार्याना थर्मल थर्मामीटर द्वावे. व बाहेर गावातून आलेले नागरिकाना वसतिगृह व शाळा येथे व्यवस्था करण्याचे जिल्हाधिकारी श्री. नवाल याना फोनवरून सांगितले. व मोर्शी मतदारसंघातील काही मुले नोकरीकरिता दुसऱ्या राज्यात गेलेले आहे त्यांना मदत करण्यात येत असल्याचे माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी सांगितले.
शेंदूरजना घाट येथे बाहेर कामाला गेलेला मजूर वापस आला असून तो समाजात वावरत आहे. कोणतेही चाचणी न करता वावरत आहे. त्याना शोधून त्याची तपसणी करून त्याना कोरोनटैन करण्याची मागणी नगरसेवक यांनी केली. या बैठकीला उपविभागीय अधिकारी महसूल श्री. नितीन हिंगोले, नगराध्यक्ष रुपेश मांडवे, उपाध्यक्ष अनिस पठाण, मुख्याधिकारी श्री. भोयर, ठाणेदार श्री, गेडाम, सह नगरसेवक उपस्थित होते.

*जे बाहेर अडकले आहे त्यांना मदत हवी असल्यास मला सांगावे – डॉ. अनिल बोंडे*


आपल्या मतदारसंघातील काही नागरिक दुसऱ्या राज्यात नोकरी करीता गेले आहे परंतु ते आता इकडे येऊ शकत नाही परंतु त्यांच्याकरिता भारतीय जनता पक्ष जेवणाची व्यवस्था करून देईल व कोणीच उपाशी राहणार नाही. जर असे असल्यास सुनील सोमवंशी मो. ७७९८५८२६३४, प्रितम अब्रुक मो. ९८३४०८७१३८, ऋषिकेश दुर्गे मो. ८६९८३२३१९८ याना संपर्क करण्याचे आवाहन माजी कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केले आहे.

 

*लोकप्रतिनिधी सहकार्य करावे – श्री. हिंगोले*
राज्यात कोरोना विषाणूला रोक्ण्यासाठी संचारबंदी लागू झालेली आहे. परंतु नागरिक मुक्तपणे फिरत असतात. जर लोकप्रतिनिधी यांनी जर सहकार्य केले व जनजागृती करून नागरिकांना घरीच राहण्यास सांगावे. जेणेकरून गर्दी होणार नाही व कोणीच घराबाहेर पडणार नाही.