किराणा व औषधांची दुकाने 12 तास चालणार, आवश्‍यकतेनुसार ही दुकाने 24 तास चालू ठेवण्यात यावी

0
697
Google search engine
Google search engine

किराणा व औषधांची दुकाने 12 तास चालणार
आवश्‍यकतेनुसार ही दुकाने 24 तास चालू ठेवण्यात यावी

बीड :परळी वैजनाथ
नितीन ढाकणे

सविस्तर वृत्त:कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये भेडसावणाऱ्या अनेक समस्या आणि त्यांना जीवनावश्यक असणाऱ्या वस्तूंचा तुटवडा भासू नये म्हणून शासनाच्या वतीने असे सांगण्यात आले आहे की किराणा व औषधांची दुकानही बारा तास जाणार आहे व गरजेनुसार अत्यावश्यक बाब अनुसार 24तास पण ठेवता येतील ही सर्व माहिती अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव चारुशीला तांबेकर यांनी दिली.
अन्नधान्य व औषधे यांचा समावेश जीवनाश्‍यक वस्तूंमध्ये केला आहे. त्यांचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी सर्व किराणा व औषधांची दुकाने सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत चालू राहणार आहे.
दरम्यान; आवश्‍यकतेनुसार ही दुकाने 24 तास चालू ठेवण्यात यावी, असे आदेश अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सहसचिव चारुशीला तांबेकर यांनी सर्व किराणा व औषध दुकानदारांना दिले आहेत.
या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधितावर कारवाई करण्याचे अधिकार पुरवठा निरीक्षक, अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक आणि पोलीस यांना दिले आहेत. जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा सुरळीतपणे व्हावा, यासाठी राज्य शासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. किराणा दुकाने व औषध दुकाने लॉकडाऊनच्या काळात कार्यरत राहतील, असे नमूद केले आहे.
मात्र, काही दुकाने बंद असल्याचे दिसून आले आहे. यामुळे अशा दुकानांवर विक्रीसाठी अतिरिक्‍त ताण पडत असल्याने गर्दी होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
यासर्व बाबी विचारात घेऊन शासनाने सर्व किराणा व औषधांची दुकाने सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत चालू ठेवण्याचे आदेश दिले आहेत.