मध्य प्रदेशातील अडकलेल्या मजुरांना पादुका संस्थांनचे अन्नछत्र

0
685
Google search engine
Google search engine

आकोटः संतोष विणके

रामजन्मोत्सव निमित्य ३५० जणांना भोजनदान

मध्य प्रदेश मधील खंडवा, भिलखेडी. बाकडी सरमशेर येथुन पाटसुल रेल्वे स्टेशनला कामा करीता आलेल्या मजुर हे लॉकडाऊनमध्ये अडकुन पडले आहेत.या गरजुंना संत श्री गजानन महाराज पादुका संस्थानद्वारा राम जन्मोत्सवाच्या निमित्ताने ३५० भुकेलेल्यांना अन्नदानाने तृप्त करन्यात आले.

तसेच अकोट रेल्वे स्टेशन परिसर व बस स्टैंड वरील गरीब लोकांना सुद्धा अन्नदान करण्यात आले.
संस्थान कडून कोरोना विषाणू संकटाच्या वेळी नियमित अन्नदान करन्यात येत आहेयाकरीता आज पादुका संस्थानचे कार्याध्यक्ष विजय ढोरे, सेवाधारी प्रशांत आकोते, वसंत खोले, शरद म्हैसने व मुंडगावातील समाजसेवी अशोक बेलसरे हे व विश्वस्त मंडळ, मुंडगावातील जनता व भक्तांच्या मदतीने आटोकाट प्रयत्न करीत आहे.