जळका जगताप येथे जंतुनाशक फवारणी गावकऱ्यांचा उपक्रम

0
447
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे :

संपूर्ण देशभरात कोरोना व्हायरसने धुमाकुळ घातला असुन त्याच्या प्रतिबंधासाठी सर्वत्र उपाययोजना करण्यात येत आहे. चांदूर रेल्वे तालुक्यातील जळका जगताप, सालोरा खुर्द व उमरपुर येथे कोरोना व्हायरस प्रतिबंधासाठी संपूर्ण गावात जंतुनाशक फवारणी करण्यात आली.

सदर फवारणी गावकऱ्यांच्या सहकार्याने करण्यात आली. यावेेळी सरपंच पंकज जगताप, शिवसेना उपतालुका प्रमुख कौस्तुभ खेरडे (जळका जगताप), गोपाल ठाकरे, अमोल गजबे, प्रफुल्ल ढोणे, विजय जयसिंगपूरे, पंकज भरडे, गोकुल रंधळे, लखन मेंडकेवार तसेच गावातील नवयुवक यांनी कोरोना विषाणुचा प्रतिबंध उपाय म्हणून जंतुनाशक फवारणीसाठी पुढाकार घेतला.