अज्ञात वृध्दाची गळफास लावुन आत्महत्या नागपुर – औरंगाबाद हायवेवर किरजवळा शेतशिवारातील घटना

0
436
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे –
नागपुर – औरंगाबाद एक्सप्रेस हायवेवर सुलतानपुर जवळील किरजवळा शेतशिवारात अज्ञात वृध्दाने गळफास लावुन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. मृतदेह कुजलेल्या स्थितीत असल्यामुळे ओळखही पटू शकली नाही.
सुलतानपुर गावाच्या अलीकडे असलेल्या किरजवळा शिवारात सुनिल खोडे यांचे शेत असुन त्यांच्या शेताच्या धुऱ्यावर हिवराचे झाड आहे. या झाडाला दुपट्ट्याने गळफास लावुन लटकलेला एक वृध्द बकऱ्या चालणाऱ्याला शुक्रवारी दिसला. ही माहिती पोलीस पाटील यांनी तळेगाव पोलीस स्टेशनला दिल्यानंतर पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळावर येऊन पंचनामा केला. सदर गळफास हा अंदाचे १५ ते २० दिवसांपुर्वी लावल्याचे समजते. मृतदेह पुर्णत: कुजलेल्या अवस्थेत होता. व मृतदेहाची ओळख सुध्दा पटविणे शक्य झाले नाही.  मृतकाचे वय अंदाजे ६० ते ७० च्या दरम्यान आहे. घटनास्थळी ठाणेदार रिता उईके यांनी सुध्दा भेट दिली. पुढील तपास तळेगाव पोलीस करीत आहे.