परळीत एक लाख सहा हजार रुपयांची दारु जप्त !

0
646
Google search engine
Google search engine

परळीत एक लाख सहा हजार रुपयांची दारु जप्त शहर पोलिसांची मोठी कामगिरी

प्रतिनिधी:- दिपक गित्ते

परळी दि – ०६- लाॅकडाऊनच्या काळात अवैधरीत्या दारु विकणाऱ्यांच्या शहर पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून एक लाख सहा हजार रुपयांची दारुसह दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

परळी अंबाजोगाई रोडवरील सपना बिअर बार अॅण्ड परमीट रुम येथे शहर पोलिसांनी धाड टाकली. यावेळी समोरचे शटर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सील केले होते. तेव्हा  पोलिसांनी  मागच्या बाजूने  उघड्या  गेटमधून  आत प्रवेश केला.

यावेळी  पोलिसांना विदेशी दारू  अवैधरीत्या  विकताना दोघांना  ताब्यात घेतले. या  जप्त करण्यात आलेल्या  दारूची  किंमत एक  लाख  सहा  हजार रुपये आहे.

ही कामगिरी जिल्हा  पोलीस अधीक्षक हर्ष  पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती  भोर,पोलिस  उपअधीक्षक राहूल  धस यांच्या  मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत शहर  पोलीस निरीक्षक हेमंत कदम, स.पो.नि. एकशिंगे, पोलिस. हे.काॅ.बांगर, मुंडे, केंद्रे, भताने सहभागी झाले होते.

शहर  पोलिसांनी याप्रकरणी सुनिल चंद्रकांत देवरे, रा.बॅक  काॅलनी व सुरेश  बाबुराव  वाघमारे रा.शंकर पार्वती  नगर यांच्या  विरुध्द कलवि65 (ई) 82,83,महाराष्ट्र  दारुबंदी  अधिनियम, सहकलम 188,कलम51 b,आपत्ती व्यवस्थापन  अधिनअधिनअधिन2005 अन्वये  गुन्हा दाखल  केला  आहे.

शहर  पोलिसांच्या  या कामगिरीबद्दल  सर्वत्र  कौतुक  होत आहे.अशीच अपेक्षा  संभाजीनगर  आणि ग्रामीण  पोलिसांकडून आहे.

दरम्यान अशा प्रकारे आपत्ती व्यवस्थापन कलम  लागल्याने  अवैध  दारू  विक्री  करणारांचे  धाबे दणाणले आहेत.