*अवैध दारूविरोधात धडक मोहिम :- तीन लाखांचा मुद्देमाल जप्त*

0
624
Google search engine
Google search engine

अमरावती : लॉकडाऊनच्या कालावधीत  राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागाने अवैध गावठी दारू निर्मीतीविरोधात संयुक्त मोहिम राबवून सुमारे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल आज जप्त केला.

पोलीस अधिक्षक हरी बालाजी एन. व राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक  राजेश कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. त्यानुसार कु-हा पोलीस ठाण्यांतर्गत कालागोटा, पारधी बेडा, मार्डी पारधी बेडा व परिसर तसेच दिवाणखेड पारधी बेडा येथे अवैध गावठी निर्मीती केंद्रावर विशेष वॉश आऊट मोहिम राबविण्यात आली. त्यात नऊ गुन्हे दाखल झाले. कारवाईत मोहा रसायन 11 हजार 960 लि. जप्त करून जागेवरच नष्ट करण्यात आले. गावठी दारू 20 लीटर, 10 जर्मनची घमेली व एक 1 मोटरसायकल असा एकूण रु. 3 लाख 3 हजार 185 रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपअधिक्षक नितीन शेंडे, निरीक्षक के.जी.आखरे, एम.

डी. पाटील, के. एन. कुमरे, अनिस शेख, राजाराम केवट, रवी राऊतकर यांच्यासह विविध अधिकारी व कर्मचारी मोहिमेत सहभागी झाले होते.