वरुड येथे शिवभोजन थाळीचा शुभारंभ – आमदार देवेंद्र भुयार यांच्या उपस्थितीत शिवभोनाला सुरुवात

0
1309
Google search engine
Google search engine

वरुड तालुका प्रतिनिधी  :-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत गरुजू, शेतकरी, मजुरांना पोटभर जेवण मिळावे यासाठी महाराष्ट्र शासनाचा “शिवभोजन थाळी” या उपक्रमाचा शुभारंभ वरुड येथे मोर्शी मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांच्या उपस्थिती शिवसेना जिल्हाध्यक्ष योगेश घारड यांच्या हस्ते करण्यात आला.

 


सध्या देशासह महाराष्ट्रात कोरोना या महाभयंकर आजाराने थैमान घातले आहे. या आजाराचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी संपूर्ण देशासह राज्यात संचारबंदी लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील गोरगरिबांची उपासमार होऊ नये म्हणुन महाआघाडी सरकारने 5 रुपयात शिवभोजन थाळी देण्यास सुरुवात केली. त्यामुळे आता वरुड तालुक्यातील गोरगरीब नागरीकांना माफक दरात शिवभोजनाचा आस्वाद घेता येणार आहे.
गरीब आणि गरजू नागरिकांसाठी राज्य सरकारने सुरु केलेल्या शिवथाळी भोजन योजनेचा आज बुधवार (दि.०८) वरुड येथे आमदार देवेंद्र भुयार यांच्या उपस्थितीत शिवसेना जिल्हाध्यक्ष योगेश घारड यांचे हस्ते शुभारंभ करण्यात आला. उल्लेखनीय म्हणजे कोरोना संक्रमण काळात लाभार्थ्यांना नाममात्र केवळ 5 रुपयात या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे गरीब व गरजूंनी शिवभोजनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. शिवभोजनाचा लाभ घेताना कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी नियमांचे पालन करीत सोशल डिस्टन्सिंग पाळून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार, वरुड तहसिलचे तहसीलदार सावंत, पंचायत समिती वरुड चे गटविकास अधिकारी वासुदेव कनाटे, मुख्याधिकारी रविंद्र पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख योगेश घारड, राष्ट्रवादी शहर प्रमुख जीतू शहा, शिवसेना तालुका प्रमुख विजय निकम, रामचंद्र राऊत, स्वाभिमानी शेतकरी संघटना शहर प्रमुख निखिल बनसोड, सचिन आंजिकर, प्रवीण देशमुख, सागर धोटे, प्रदीप शिरसाम, प्रभाकरभाऊ काळे, दीपक बोदरे , जसमत सिंग, दिपकभाऊ पोहणे , अमित साबळे , अनिकेत भुयार, प्रफुल्ल अनासाने , फिरोजभाई आदी उपस्थित होते.