एकविरा शाळेत कोरोना काळातही विविध ऑनलाइन उपक्रम चालू…ढिशुंम ढिशुंम विथ कोरोना ते ऑनलाइन शिक्षण सर्व गोष्टीत अग्रेसर एकविराचे सर्वात कौतुक..

0
1311
Google search engine
Google search engine

एकविराचे सर्वात कौतुक..

दर्यापूर:- स्थानिक एकविरा स्कुल ऑफ ब्रिल्लीयण्ट्स , जी आपल्या विविध उपक्रमांनी ओळखल्या जाते, त्या शाळेत कोरोना मुळे चालू असलेल्या लॉक डाऊन च्या काळातही विविध उपक्रम चालू आहेत
सदर शाळेत सोशल नेटवर्किंग चा उपयोग घेत विद्यार्थ्यांना रोज विविध वर्कशीट , गृहपाठ, द्वितीय सत्र परीक्षा इ करवून घेतले आहे…
तसेच मुलांसाठी चालवलेल्या “ढिशुंम ढिशुंम विथ कोरोना” उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे ज्यामध्ये छोट्या छोट्या मुलांनी कोरोना बद्दल जन जागृती साठी विविध निबंध, ड्रॉइग, व्हिडिओ, कविता केल्यात ज्या यूट्यूब तसेच फेसबुक वर टाकण्यात आल्या, व जे पालक या भयावह स्थितीतही समाजा साठी कार्य करत आहेत त्यांचे कौतुक म्हणून त्यांचा फोटो तसेच कार्य हे सुध्दा सर्वत्र शेअर करण्यात आले.
विशेषतः वर्ग ९ व १० च्या मुलां करिता शाळेने ऑनलाइन शिक्षणाची सोय केली आहे ज्यामध्ये पूर्ण विद्यार्थी घरूनच शैक्षणिक धडे घेत आहेत, तसेच अश्या प्रकारचे विविध कार्यक्रम घेऊन आम्ही कोरोना प्रसार रोखण्याकरिता जनजागृती व ऑनलाइन शिक्षणाकरिता पूर्ण प्रयत्न करू तसेच लवकरच वर्ग १ ते ८ चे सर्व वर्ग ऑनलाइन स्वरूपात घेऊ असे प्रतिपादन शाळेचे प्राचार्य श्री. तुषार चव्हाण यांनी केले.
सदर सर्व उपक्रमात शाळेचे पालक, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विविध क्षेत्रात लॉक डाऊन च्या काळातही आपले योगदान देणाऱ्या व आपल्या शेतकरी बांधवांचे शाळा प्रशासनातर्फे धन्यवाद मानले.

-प्राचार्य तुषार चव्हाण यांनी माहिती दिली की ऑनलाइन एज्युकेशन व विविध उपक्रमात विद्यार्थी व शिक्षक मध्ये कमालीचा उत्साह दिसून येत आहे व हीच काळाची गरज आहे.
आपण सर्व मिळून कोरोना च्या पसरलेल्या अंधारातून लवकरच प्रकाशमय दैनंदिन जीवनाकडे परत येऊ अशी आशा मी बाळगतो. शाळेचे सभासद डॉ.अरुणा भट्टड, डॉ.भारंबे, श्री.दिलीप पखान, सौ.पूनम पणपालिया, श्री. अतुल मेघे, श्री.वैभव मेघे, डॉ.उत्कर्ष भट्टड यांच्या तर्फे नेहमीच प्रोत्साहन व मार्गदर्शन नेहमीच मिळत असत तसेच विद्यार्थ्यांनी काही काळ मैदानी खेळ सोडून इनडोअर गेम व ऑनलाईन एज्युकेशन ला पसंदि द्यावी असे उद्बोधन केले.