खाकी’चे कौतुक; पोलीस संचलनादरम्यान चांदुर करांनीकेली पुष्पवृष्टी चांदुर बाजार :- बादल डकरे

0
963
Google search engine
Google search engine

‘खाकी’चे कौतुक; पोलीस संचलनादरम्यान चांदुर करांनीकेली पुष्पवृष्टी

चांदुर बाजार :- बादल डकरे

चांदुर बाजार पोलीसांनी दिनांक 12 मार्च ला काढलेल्या रूट मार्च (संचलनाच्या) वेळी चांदुर बाजार माळी पुरा येथील नागरिकांनी सोशल डिस्टिंग चे पालन करत फुलांचा वर्षाव करून त्याच्याबद्दल कृतद्यता व्यक्त केली.

चांदुर बाजार पोलीसांनी शहरातून काढलेल्या रूट मार्चप्रसंगी रविवारी  एक अनोखे दृष्य दिसले. स्थानिक माळीपुरा येथील नागरिकांनी पोलीसांच्या अंगावर फुलांचा वर्षाव करत कोरोनाच्या युद्धातील त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर गेल्या महिनाभरापासून पोलीस प्रशासन नागरिकांच्या सेवेत दिवसरात्र तैनात असून सध्या लॉकडाऊन असल्याने पोलीस सतत गल्लोगल्ली फिरून कधी प्रेमाने तर कधी कायद्याचा धाक दाखवून नागरिकांना घरात बसण्याचे सांगत आहे. विनाकारण फिरना-या लोकांना वठणीवर आणण्याचे काम पोलीस प्रशासनाने केले आहे. त्यामुळेच चांदुर बाजार शहर तालुक्यात अनूचित प्रकार अथवा काही घटनाघडामोडी घडल्या नाहीत. त्यामुळे तालुक्यातील जनता पोलीस प्रशासनाच्या सध्याच्या कार्यपध्दतीवर खुश आहेत. आज रविवारी सकाळी चांदुर बाजार पोलीसांचे रूट मार्च पोलीस निरिक्षक उदयसिग साळूके यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आली. यावेळी नगरसेवक गोपाल तिरमारे मित्रमंडळातर्फे पोलीसांवर फुलांचा वर्षाव करून पोलीसांच्या कामकाजाबद्दल कौतुक व्यक्त करून त्यांचे स्वागत केले.