लॉकडाऊनमध्येही “वॉटरमॅन” ची निस्वार्थ सेवा चेकपोस्ट वरील पोलीसांना दररोज देतात चहा – पाणी

0
1011
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे –
कुणाला कशाचा छंद असेल, हे सांगता येत नाही. मात्र अनोळखी वाटसरूंना थंडगार पाणी पाजण्याचा अजब छंद चांदूर रेल्वे तालुक्यातील बासलापुर येथील विवेक उर्फ राजू वासुदेवराव चर्जन या शेतकऱ्याने मागिल अनेक वर्षापासुन जोपासला आहे. तर हाच छंद आता संचारबंदी सुध्दा कायम असुन हा “वॉटरमॅन” निस्वार्थपणे आपली सेवा बजावत आहे.
कोरोना व्हायरसने जगात कहर केला असुन यामुळे देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन घोषीत करण्यात आले. या काळात कुणाचीही गैरसोय होऊ नये म्हणुन अनेक सामाजिक संस्था आपले योगदान देत आहे. तर यामध्येच सगळीकडे “वॉटरमॅन” म्हणुन प्रसिध्द असलेले राजु चर्जन हे सुध्दा आपली निस्वार्थ सेवा बजावत आहे. ते चांदूर रेल्वे बायपासजवळ असलेल्या चेकपोस्टवर पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असतांना त्यांच्या साठी दररोज चहा व पाण्याची व्यवस्था करीत आहे. याशिवाय रस्त्यात किंवा शहरात जो कोणी भेटेल त्यांना थंड पाणी पाजत आहे. तसेच ते पक्षांसाठी पाण्याची सुध्दा अनेक ठिकाणी करीत आहे. वॉटरमॅन हे केवळ लॉकडाऊन मध्येच नाही तर प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात गाडीवर पाण्याच्या बॅग घेऊन निघत व वाटसरूंना पाणी पाजत असतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड व लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदी झाल्या आहे.