ठाणेदार गोपाल उपाध्याय यांनी पकडला लाखोंचा गुटखा 3 आरोपी यांना अटक

0
2739
Google search engine
Google search engine

 

ठाणेदार गोपाल उपाध्याय यांनी पकडला लाखोंचा गुटखा
3 आरोपी यांना अटक,

चांदुर बाजार :-

शिरजगाव कसबा पोलीस स्टेशन चे ठाणेदार याना मिळालेल्या माहिती च्या आधारे त्यांनी शिरजगाव कसबा पोलीस स्टेशन हद्दीतील करजगाव या गावात दिनांक 15 एप्रिल 2020 ला दुपारी 3 च्या दरम्यान गुटख्याची वाहतूक करणाऱ्या राहुल भुसाटे रा.नेताजी चौक करजगाव याला गुटखा विक्री आणि वाहतूक करत असताना पकडले.

त्याच्या आधारे त्यांनी करजगाव येथील तेलीपुरा या ठिकाणी रहिवासी असलेल्या देवेंद्र काळे यांच्या घरात अवैध पणे गुटखा आढळून आला.त्यांच्या ताब्यातून 123500 रुपयांचा तंबाखूजन्य आणि गुटख्याची पाकीट जप्त करून त्यांच्या वर गुन्ह्याची नोंद करण्यात आली.ताब्यात घेतलेल्या चौकशी केली असता हा माल विनोद काळे या नामक व्यक्ती चा असल्याने त्याला सुद्दा शिरजगाव कसबा पोलिसांनी तात्काळ अटक केली

सदर कार्यवाही ही अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ श्री हरी बालाजी एन, अ.पो.अ.श्री घुगे व उपविभागीय पो. अधिकारी श्री अबदागिरे साहेब यांचे मार्गदर्शनात करण्यात आली. कारवाईत सहभाग शिरजगाव कसबा चे ठाणेदार सपोनि गोपाल उपाध्याय, पोहवा संजय तायडे, पोना पुरूषोत्तम माकोडे, पोना केराम, पोशि ठाकरे, पोशि अंकुश अरबट, पोशि प्रताप, पोलिस पाटील अश्विन यांनी पार पाडली.

फोटो मेल केला आहे.