उस्मानाबाद लातूरचे पोलीस देतात उठाबशाची शिक्षा !

0
651
Google search engine
Google search engine

उस्मानाबाद लातूर जिल्ह्याच्या सीमेवर पोलिस देतात उठाबशाची शिक्षा

हुकमत मुलाणी / उस्मानाबाद

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी उस्मानाबाद व लातूर जिल्ह्याच्या सिमेवर दोन्ही जिल्ह्यातील पोलीस हे अतिशय बारकाईने कसुन चौकशी करत असल्याचे चित्र पहायला मिळाले दरम्यान आज उस्मानाबाद व लातूर जिल्ह्याच्या सिमेवर पळसप पाटिजवळ ढोकी पोलीस ठाणे व मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस हे ऐकत्रीत कार्यवाही करत आहेत त्यामुळे खोटे बहाने बनवून वाहनात चार पेक्षा अधीक व्यक्ती आढळल्यास त्यांना हे पोलीस उठाबशा काढायला लावून शिक्षा देत आहेत या पथकामध्ये महसुल विभागाचे कर्मचाही सहभागी आहेत या कार्यवाही दरम्यान सहाय्यक फौजदार बालाजी चिटकलवार , हवलदार सुर्यकांत पाटिल,पोलीस नाईक राजाभाऊ जोगदंड, बालाजी मुंडे ,अभिजीत देशमुख ,सचिन गुंड , सोबत महसुल विभागाचे पळसप तलाठी सज्जाचे संजय माळी , टाकळी ढोकी तलाठी सज्जाचे तलाठी किशोर गायकवाड यांचा समावेश आहे