नारायण समुद्रे यांचे अपघाती निधन !

0
1759
Google search engine
Google search engine

नारायण समुद्रे यांचे अपघाती निधन !


उस्मानाबाद / प्रतिनीधी

उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी येथील नारायण समुद्रे यांचे अपघाती निधन झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दि.२०/४/२०२० रोजी वाकरवाडी ढोकी रोडवर त्यांच्या शेततून त्यांच्या चार चाकी गाडित येत असताना अंदाचे रात्री साडे आठ वाजण्यच्या सुमारास येत होते दरम्यान कस्तूरे यांच्या शेताजवळ गाडिचे डाव्या बाजूचे पुढचे टायर फुटल्यमुळे त्यांचा गाडिवरील ताबा सुटला व गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्यात पलटी झाली.या घटनेत समुद्रे हे गाडीत ऐकटेच होते ते स्वता ड्रायव्हींग करत होते त्यामुळे आपघातात गाडीच्या स्टेअरींगचा दाब त्यांच्या छातीवर बसल्याने बेशुद्ध होते. घटनेची माहीती ढोकी गावात वार्यासारखी पसरली दरम्यान ढोकीकरांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांना तत्काळ उपचारासाठी प्रथमिक आरोग्य केंद्र ढोकी येथे दाखल केले आसता परस्थीती गंभीर असल्यामुळे समुद्रे यांना पुढिल उपचारासाठी उस्मानाबाद येथील सह्याद्री हाँस्पिटल येथे नेण्यात आले होते. तेथे उपचार सुरु आसताना थोड्याच वेळात त्यांना डाँक्टरांनी मयत घोषित केले.
नारायण समुद्रे हे जिल्हा बॅकेचे माजी व्हाईस चेअरमन तथा तुळजाभवानी जिल्हा दुध संघाचे माजी चेअरमन,ढोकी तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष ,ढोकी विशाल कार्यकारी सोसायटीचे विद्यमान चेअरमन ,ढोकी ग्रामपंचायतचे मार्गदर्शक ढोकी गावाचे लाडके नेते होते.
समुद्रे त्यांचे शवविच्छेदन करुन रात्री दोन वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मुळ गावी ढोकी येथे शव आणन्यात आले.अंत्यवीधी २१/४/२०२० रोजी ढोकी येथे होणार असल्याची प्राथमिक माहिती समजत आहे.त्यांच्या पश्चात ऐक मुलगा , दोन मुली , तिन पुतणे ,नातवंडे असा मोठा परिवार आहे.