कडेगाव तालुक्यातील एकूण दिड लाख लोकांचा सर्व्हे पुर्ण.

Google search engine
Google search engine

कोरोनो रोखण्यासाठी जिल्हा परीषद, पंचायत समिती यांचे जोरदार प्रयत्न

बाहेरून आलेल्यांना घरीच थांबण्याच्या सुचना

सांगली/ कडेगांव:न्युज –

हिराजी देशमुख
कडेगांव तालुका पत्रकार संघटना संस्थापक अध्यक्ष

 

कडेगाव तालुक्यातील घरघरातील सर्व लोकांचा सवै म्हणजे तालुक्यातील दिड लाख लोकांचा सवै झाला असून ९००० हजार ऊसतोडणी मजूर यांचाही सवै झाला आहे. तालुक्यातील १८९ लोकांना होम क्वाँरनटाईट केलेले आहे त्या पैकी २२ लोकांचा कालावधी पूर्ण झाला आहे. तालुक्यात बाहेरून आलेल्या लोकांना घरीच थांबण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. तालुक्यातील २०० आरोग्य विभागाचे कर्मचारी तसेच कडेगाव नगरपंचायत २५ कर्मचारी काम करीत आहेत. पोलिस आपली सेवा अहोरात्र तालुक्यात देत आहेत.असे तालुक्यात सध्या स्वतः चा जीव धोक्यात घालून काम करीत आहेत.
कडेगाव तालुक्यातील जिल्हा परीषद, पंचायत समिती, महाराष्ट्र शासनाचे दोन ग्रामीण रुग्णालय,गावोगावातील आरोग्य कर्मचारी, कडेगाव नगरपंचायत कर्मचारी यांनी गावोगावातील मुख्य रस्ते, गल्ली बोळ येथे पावडर व जंतूनाशक फवारणी केली जात आहे.
सध्या कोरोनाचा फैलाव वाढत असून मुंबई, पूणे, ठाणे अशी मोठमोठी शहरे कोरोनाचा केंद्रबिंदू ठरत आहेत.तेथे दररोज वाढत असलेली कोरोना संसर्गजन्य रुग्णाची संख्या विचारात घेता.कडेगाव तालुक्यात व कडेगाव नगरपंचायत कार्यक्षैत्रात कोणत्याही परिस्थितीत कोरोनाचा शिरकाव होवू दयायचा नाही. असा निर्धार प्रांताधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी, नगरपंचायत मुख्याधिकारी, पोलीस प्रशासन यांनी केला आहे. त्याला नागरीकांचीही चांगली साथ मिळत आहे. घरी रहा,सुरक्षित रहा या अवाहनाला प्रतिसाद देत तालुक्यात अत्यावश्यक सेवे शिवाय कोणी बाहेर पडत नाहीत. त्यातूनही कोणी रस्त्यावर विनाकारण दिसल्यास पोलीस कारवाई करीत आहेत.
तसेच तालुक्यात व विशेषतः कडेगाव शहरात विक्रेते व ग्राहकांच्या कडून शासनाने घालून दिलेल्या नियमांचे व जिल्हा अधिकारी यांच्या आदेशाचे पालन व्हावे म्हणून गावोगावातील आठवडा बाजार व कडेगाव शहरातील भाजी मंडई बंद करण्यात आलेल्या आहेत.
जिल्ह्यात सर्वाधिक जीवनावश्यक किटचे वाटप कडेगाव तालुक्यात झालेले दिसते. महसूल विभागाचे प्रांताधिकारी गणेश मरकड तहसिलदार डाँ.पाटील यांनी काही लोकांना अवाहन केले नंतर मंत्री डाँ.विश्वजीत कदम व माजी. जि.प.अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या सह तालुक्यातील मंडळे,संघटना, किराणा दुकानदार,पाणी संघर्ष समिती व पत्रकार संघटनेच्या वतीने मोठ्या प्रमाणात आज पर्यंत जवळजवळ २००० जीवनावश्यक किटचे वाटप करण्यात आले आहे. तालुक्यातील रेशनकार्ड धारक व बिगर रेशनकार्ड धारकांना रेशनिंग देण्यात आले आहे. तालुक्यातील सर्व नागरीकांनाही रेशनिंग. वाटत योग्य रीतीने सुरु आहे. तसेच कडेगाव शहरात सामान्य लोकांना शिव भोजन ५ रूपयात शेकडो लोकांना दररोज देण्यात येत आहे.
जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष व जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी पलुस व कडेगाव तालुक्यातील सामान्य जनतेसाठी २००० जीवनावश्यक किटस देण्यात आली आहेत. यामुळे तालुक्यातील सामान्य जनतेला मोठा आधार झाला आहे.
कडेगाव तालुक्यातील महसूल विभाग,जिल्हा परीषद व महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग,कडेगाव नगरपंचायत, विशेषतः कडेगाव व चिंचणी पोलिस अधिकारी यांच्या कडून तालुक्यातील सर्व अधिकार हे दिवसरात्र काम करीत आहेत. जमावबंदी सह शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे तसेच दिलेल्या आदेशाचे तालुक्यातील व कडेगाव शहरातील जनतेने पालन करावे असे अवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे.
चौकट करावी.
कडेगाव तालुका वैधकिय अधिकारी डाँ.अशोक कुमार वायदंडे व कडेगाव ग्रामीण रूग्णालय प्रमुख डाँ.आशिष कालेलकर यांनी माहिती दिली की कडेगाव तालुक्यात व शहरात विविध राजकीय पक्षाचे नेते,स्वच्छता दूत,कर्मचारी, बचतगट, अंगणवाडी सेविका व मदतनिस,प्राथमिक व खाजगी शाळा शिक्षक,शहरातील हाँस्पीटल डाँक्टर, प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी यांच्या माफैत गावोगाव व शहरातील प्रभागनिहाय घरोघरी जावून विविध प्रकारे जनजागृती करण्यात येत आहे.संपूर्ण कडेगाव तालुक्यात आज पर्यंत एकही कोरोनाचा संशयित रुग्ण सापडला नाही. आता यापुढेही तालुक्यात कोणीही व्यक्ती नव्याने गावात व शहरात आली तर तातडीने तालुका आरोग्य अधिकारी डाँ.अशोककुमार वायदंडे यांना कळविण्यात यावे.तसेच तालुक्यातील जनतेने जास्तीस जास्त एकमेकापासून ठरावीक अंतरावर राहूनच वावर करावा असे अवाहन करण्यात आले.