महिलेकडून १० लीटर हातभट्टी दारू जप्त – चांदूर रेल्वे पोलीसांची प्रो रेड

0
3026
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे –
चांदूर रेल्वेत पोलीसांनी एका महिलेवर प्रो रेड केली असता तिच्याजवळून १० लीटर हातभट्टी दारू जप्त केल्याची कारवाई सोमवारी सायंकाळी केली.
चांदूर रेल्वे तालुक्यात गावठी दारूंचा धुमाकुळ सुरू असुन पोलीसांच्या एका पाठोपाठ एक कारवायांमुळे या दारूवाल्यांचे कंबरडे मोडले आहे. अशातच शहरातील राजीव गांधी नगर येथील राजकन्या रवींद्र भोसले हिच्यावर चांदूर रेल्वे पोलीसांनी सोमवारी प्रो रेड केली असता तिच्यावर १० लिटर हातभट्टी दारू मिळून आली. महिला पोलीसांनी सदर आरोपी महिलेला ताब्यात घेतले व दारू जप्त करून नष्ट केली. ही कारवाई पोलीस निरिक्षक दीपक वानखडे यांच्या नेतृत्वात ना. पो. कॉ. गणेश घुले, चंद्रशेखर पाठक, पो. कॉ. जगदीश राठोड, संतोष राठोड, महिला पोलीस निलिमा बान्ते, आरती कुंजेकर यांनी केली