कोंडमध्ये खाजगी सावकारांचा तगादा वाढला गोपाळ सर्जे वैतागला !

0
952
Google search engine
Google search engine

कोंडमध्ये खाजगी सावकारांचा तगादा वाढला
गोपाळ सर्जे वैतागला !

उस्मानाबाद / प्रतिनीधी

उस्मानाबाद तालुक्यातील कोंड येथे खाजगी सावकारांचा नागरीकांना तगादा असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती आशी कि कोंड येथील गोपाळ धनराज सर्जे याने घर प्रपंच भागवण्यासाठी व वाहन दुरुस्त करण्यासाठी ऐका जवळच्या नातेवाईकाकडून पन्नास हजार रुपये व्याजाने घेतले होते. हे पैसे घेऊन जवळपास दहा माहिने झाले आहेत.
आत्ता पर्यत पन्नास हजार रुपयाचे व्याज १० हजार देऊन मुद्दल ५० हजार रुपये परत केले ऐकूण ६० हजार रुपये परत दिले तरीही तो खाजगी सावकार आज दि. २३/४/२०२० रोजी गोपाळ सर्जे याला १४ हजार रुपये आजुन मला व्याज दे नाही तर बसुन रहा अशी धमकी संबंधीत खाजगी सावकाराने दिली असल्याची माहिती गोपाळ सर्जे याने सांगीतली.तसेच दिवसभरात बर्याच वेळा फोन करुन नाहक त्रास देत होता व सतत व्याजाच्या पैशासाठी घरी चकरा मारुन तगादा लावत होता अशीही माहिती गोपाळ सर्जे यानी दिली. यावेळी गोपाळला सावकार हा सतत फोन करुन व्याजाच्या पैशासाठी तगादा लावत असल्यायामुळे मानसीकता ढासळली आसल्याचे सांगीतले .या नंतर जर सावकाराने पैसे मागीतले तर पोलीसात तक्रार देणार असल्याचेही सांगीतले.या सावकाराने गावातील बर्यात गोरगरीब लोकांना १० रु शेकडा दर महिना व्याजाने पैसे दिल्याची चर्चा सध्या गावात चांगलीच रंगू लागली आहे.
तसेच गावात काहि महिलाही खाजगी सावकारकी करत असल्याचीही चर्चा सुरु आहे.अशा विनापरवाना सावकरी करणारे जर कोणते खाजगी सावकार कोणाला त्रास देत असतील तर सबळ पुराव्यानीशी पोलीसात तक्रार करावे असे आवाहन करण्यात येत आहे.