उस्मानाबादच्या श्नीनीवास घुगेंसह , बहाद्दर पोलीसांना महासंचालकांचे मानचिन्ह !

0
1007
Google search engine
Google search engine


उस्मानाबाद पोलीस दलातील ७ बहाद्दर ‘पोलीसांना महासंचालक यांचे मानचिन्ह’ प्राप्त.



उस्मानाबाद / प्रतिनीधी
सध्या तुळजापूर येथील मंदिर चौकी येथे कार्यरत असलेले श्रीनिवास संभाजी घुगे, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक यांच्यासह एकुण ७ जणांना पोलीस महासंचालक यांचे मानचिन्ह मिळाल्याबद्दल सर्व स्तरामधून उस्मानाबाद पोलीसांचे अभिनंदन केले जात आहे .
याबाबत अधीक माहिती अशी की, महाराष्ट्र पोलीस दलाच्या विविध विभागांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पोलीस अधिकारी- कर्मचारी यांना प्रति वर्षी महाराष्ट्र राज्य, पोलीस मुख्यालय, मुंबई तर्फे ‘पोलीस महासंचालक यांचे मानचिन्ह’ (डि.जी. Insignia) प्रदान केले जाते. सन- २०१९ करीता मानचिन्ह प्राप्त सदस्यांची नावे आज दि. ३०.०४.२०२० रोजी जाहिर करण्यात आले आहेत . त्यात उस्‍मानाबाद पोलीस दलातील

1) कैलास सर्जेराव लहाने, पोलीस उपनिरिक्षक- पो.ठा. नळदुर्ग, 2) श्रीनिवास संभाजी घुगे, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक- तुळजापूर मंदिर चौकी, 3) प्रदीप महादेव जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक- पो.ठा. तुळजापूर, 4) सुकूमार गणपत बनसोडे, पोलीस हवालदार- पो.ठा. तुळजापूर, 5) आत्माराम उत्तम जाधव, पोलीस हवालदार- पो.ठा. तुळजापूर, 6) सुनिल अमृत कोळेकर, पोलीस हवालदार- पो.ठा. कळंब

7) रामेश्वर बापूराव उंबरे, पोलीस हवालदार- पोलीस मुख्यालय,

मानचिन्ह प्राप्त झाल्याबद्दल मा. पोलीस अधीक्षक श्री. राज जिलक रौशन व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. संदीप पालवे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.