आयटीआयच्या तासिका तत्त्वावरील शिक्षकांचे भवितव्य धोक्यात?

0
1081
Google search engine
Google search engine

नविन पदभरतीमुळे जुन्यांची उपासमार

आकोटः ता.प्रतिनिधी

कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या मार्फत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचनालया अंतर्गत आयटीआय मधील सातशे निदेशक पदांची भरती करण्यात येणार आहे.त्यामुळं
आयटीआय मधील सध्याच्या तासिका तत्त्वावरील शिक्षकांचे भवितव्य धोक्यात येणार आहे.त्यापूर्वी तासिका निदेशकाचा प्रश्न प्रथम प्राधान्याने मार्गी लावण्यात यावा अशी मागणी सध्या कार्यरत तासिका निदेशकांची आहे. जो पर्यंत या तासिका निदेशकांचा प्रश्न मार्गी लागत नाही तो पर्यंत शासनाने पदभरती थांबवावी व तासिका निदेशकांवर होणारा अन्याय दूर करण्यात यावा. ही पदभरती झाल्यास अनुभवी तासिका निदेशकांना नोकरी गमवावी लागणार आहे.निदेशकांवर बेरोजगारी व उपासमारीची वेळ येणार आहे.असल्याचं निदेशकांचं म्हणणं आहे.
२०११ पासून भरती बंदी असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून कौशल्य विकास व उद्योजकता विभागातील आयटीआय मधील निदेशकांची अनेक पदे रिक्त आहेत.
एका आकडेवारीनुसार राज्यातील ४१७ आयटीआय मध्ये सुमारे ३००० तासिका निदेशक रिक्त पदांवर कार्यरत आहेत.
गेल्या दहा वर्षा पासून तासिका निदेशक न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत
तुटपुंज्या मानधनात गेली अनेक वर्ष कौशल्य प्रशिषण व कुशल कारागीर घडविण्याचे काम करत आहेत .
यापूर्वी अनेक वेळा पदभरतीत तासिका निदेशक यांना वेळोवेळी डावलण्यात आले आहे.